खामगाव :- ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल मधे राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी झाली.
कार्यक्रमांची सुरवात सरस्वती तसेच जिजाऊ आणि विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करुन झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री के आर राजपूत हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री जितेंद्रसिह चौहान हे होते. सौ संगीता चौहान आणि कवीश्वर्सिंह राजपूत यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पळसकर मॅडम यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात श्री के आर राजपूत सरांनी राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून स्फूर्ती घेत कधीही मागे न बघता आपले ध्येय साध्य करावे आणि मिळालेले हे जीवन उत्कृष्ठ रित्या घडवावे. असे सांगितले. सौ चौहान व इतर मान्यवरांनी आपल्या भाषणात जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदाच्या जीवनावर बोलत उपस्तित विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विदयार्थ्यांनी माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद तसेच इतर थोर पुरुषांची वेशभूषा करत भाषणे केली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे खुपसाऱ्या आई मुलाच्या जोडीने, माँ जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषाकरत या थोर पुरुषांच्या जीवनाचे दर्शन उपस्थित पालक वर्गाला करुन दिले.
कार्यक्रमाचे संचालन सौ वेरूळकर व सौ पातूरकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सरदेशमुख व चोपडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका सौ प्रियंका राजपूत, सौ महाजन, सौ वैराळे, कु उगले, सौ अश्विनी देशमुख, सौ कस्तुरे, सौ विजया पोकळे, सौ प्रिया देशमुख, गायत्री पोकळे, कोमल आकणकर, सपना हजारे, वंदना गावंडे, सुवर्णा वडोदे, राजकन्या वडोदे, प्रतीक्षा साबळे आदींनी परिश्रम घेतले.
Post a Comment