रोटरी क्लब खामगांव व शेगांव यांचेव्दारे संयुक्तपणे डिस्ट्रिक्ट-3030 कॉन्फरन्स ‘आनंदोत्सव’
(खामगाव जनोपचार न्यूज)
रोटरीतील डिस्ट्रिक्ट-3030 (विदर्भ ते नाशिक असे 16 जिल्हे व 100 रोटरी क्लब्ज) ची डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स ‘आनंदोत्सव’ चे भव्य आयोजन 7 व 8 जानेवारी 2023 रोजी शेगांव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य ऑडीटोरीयम मध्ये व काही कार्यक्रम खामगांव येथील श्री हरी लॉन्स या ठिकाणी याप्रमाणे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त वक्ते जसे की भारतातील प्रथम दोन्ही हात नसणारे व पायाने कार चालविण्याचे लायसन्स मिळालेले कार रेसर आणि पट्टीचे पोहणारे श्री विक्रम अग्निहोत्री, मेळघाट व धारणी येथे कार्य करणारे प्रसिध्द समाजसेवक डॉ रवी व डॉ स्मिता कोल्हे, गायिका सुश्री अनुराधा पौडवाल, ब्रम्हकुमारीजच्या श्रेया दीदी, मोटीव्हेशनल स्पिकर श्री सोनु शर्मा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन श्री ललितजी गांधी, उद्योगपती श्री अनिलजी गोयल, ‘चला हवा येवु द्या’ फेम श्री भारत गणेशपुरे, स्त्रियांचे व मुलांचे ज्वलंत प्रश्न कायदेशीर पध्दतीने मार्गी लावणा-या अँडव्होकेट पूजा कुटे, जगातील सर्वात मोठ्या पतसंस्थेचे प्रणेते सहकार महर्षी श्री राधेश्यामजी चांडक, एम.बी.ए.चायवाला म्हणुन प्रसिध्द ब्रॅन्डचे सीईओ श्री विवेक बिल्लोरे यांनी आपली हजेरी लावुन रोटेरीयन्सच्या ज्ञानात व मनोरंजनात भर पाडली. दिवसभरातील सर्व कार्यक्रम शेगांव येथे संपन्न झाले तर सुप्रसिध्द पार्श्वगायक श्री विनोद राठोड यांच्या वाद्यवृंदाचा कार्यक्रम श्री हरी लॉन्स खामगांव येथे आयोजित करण्यात आला होता. विविध कार्यक्रमांचा लोकांना अगदी जवळून व्यवस्थितपणे आस्वाद घेता यांवा म्हणुन जागोजागी मोठेमोठे एल.सी.डी.स्क्रीन्स लावण्यांत आले होते. या दोन दिवसांत रक्तदान शिबीर, एन.सी.डी.कॅम्प व योगासन सत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते.
👆👆ही जाहिरात आहे👆👆
जनोपचारच्या जाहिरात साठी संपर्क 820 881 94 38
या कॉन्फरन्ससाठी डिस्ट्रिक्ट-3030 च्या 1800 प्रतिनिधींनी आपली सहकुटुंब नोंदणी अगोदरच केली होती. या सर्वांच्या निवासासाठी शेगांव येथील भक्तनिवास, आनंद विहार, आनंद विसावा, खामगांव व शेगांव येथील काही खाजगी हॉटेल्स व अनेक रोटरी कुटुंबियांकडे ‘होम स्टे’ स्वरुपात घरीसुध्दा करण्यात आली होती. बाहेरगांवाहुन आलेल्या लोकांना रेल्वे स्टेशनहुन आणण्याची व पोहचविण्याची आणि जातांना त्यांना वाटेत लागणा-या टिफीन्सची देखील व्यवस्था करण्यांत आली होती. रोटेरीयन्स सोबत आलेल्या चालकांसाठी भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली होती.
दिनांक 7 जानेवारी रोजी सर्व आजी-माजी डिस्ट्रिक्ट गर्व्हनर्सची संत गजानन महाराज संस्थानाच्या वारक-यांच्या हस्ते दिंडी काढण्यात आली ज्यामध्ये गांवा-गांवाहुन आलेले बहुसंख्य रोटरी सदस्य सम्मिलित झाले होते. त्यानंतर उद्घाटन समारंभाची सुरुवात राष्ट्रगीताने व लगेचच गणेश वंदनाने झाली. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. कॉन्फरन्स चेअरमन रो देवेश भगत यांनी प्रास्ताविक केले तर डिस्ट्रिक्ट गर्व्हनर डॉ आनंद झुनझुनुवाला यांनी स्वागतपर संबोधन केले. याप्रसंगी रो श्रुती नथानी व त्यांची चमु यांनी तयार केलेल्या गर्व्हनर मंथली न्युजलेटरचे विमोचन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय कॉन्फरन्स सेक्रेटरी रो राजीव नथानी यांनी करून दिला. पूर्वाध्यक्ष रो टौबी भागवागर यांनी रोटरीतील मानाचे दोन पुरस्कार अनुक्रमे डॉ राम गावंडे पुरस्कार व एडुल एडुलजी पुरस्कारांची घोषणा केली. प्रमुख आश्रयकर्ते श्री अनिलजी गोयल (कालिंका स्टील्स जालना) यांनी सभेस शुभेच्छापर संदेश दिला. याप्रसंगी कीनोट स्पिकर म्हणुन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे राज्य अध्यक्ष व एक उत्कृष्ट वक्ता श्री ललितजी गांधी हे होते. आभार प्रदर्शन कॉन्फरन्स सचिव रो देवेन्द्र भट्टड यांनी केले. माजी प्रांतपाल रो राजीव शर्मा यांनी मॉडरेटर म्हणुन कार्य पाहिले. रोटरी युथ एक्स्चेन्ज कार्यक्रमाअंतर्गत मागील 6 महिन्यांपासुन भारतात वास्तव्य करुन असलेल्या फ्रान्स, अमेरीका व स्पेन येथील विद्यार्थ्यांनी नागपूर येथील रो ममता जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृतीवर आधारीत केलेल्या नृत्यमय सादरीकरणाव्दारे सर्वांची मने जिंकली. तसेच रोटरी क्लब नागपूर ईशान्य यांनी पर्यावरण जागृतीवर सादर केलेली संगीत नाटीका सर्वांच्या हृद्यात घर करुन गेली. यावेळेस गजानन महाराजांच्या मंदीरास भेटीचे देखील आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 8 जानेवारी रोजी समारोपीय कार्यक्रमात डिस्ट्रिक्ट गर्व्हनर डॉ आनंद झुनझुनुवाला, 2024-25 चे डिस्ट्रिक्ट गर्व्हनर रो राजिंदरसिंह खुराणा, कॉन्फरन्स समन्वयक रो प्रमोद अग्रवाल, माजी प्रांतपाल रो राजीव शर्मा, कॉन्फरन्स सल्लागार पूर्व प्रांतपाल रो रमेष मेहेर, माजी प्रांतपाल रो राजीव शर्मा, माजी प्रांतपाल रो शब्बीर शाकीर यांची समयोचित संबोधने झाली. कॉन्फरन्स चेअरमन रो देवेश भगत यांनी बॅटन पुढील वर्षी नाशिक येथे 6 व 7 जानेवारी 2024 रोजी आयोजित होणाऱ्या कॉन्फरन्सचे चेअरमन रो जयेश संघवी यांचे सुपूर्द केला. आभार प्रदर्शन रोटरी क्लब शेगांव चे रो सचिन गाडोदिया यांनी प्रस्तुत केले. रोटरी क्लब खामगांवचे अध्यक्ष रो आलोक सकळकळे यांनी कार्यक्रम समाप्तीची विधीवत घोषणा केली.
रो उमेश अग्रवाल, रो शिवकुमार डागा, रो श्रुती नथानी व रो करण चोपडा यांनी वेगवेगळ्या सेशन्सचे प्रभावी संचालन केले. जागेअभावी त्यांची नांवे देता येणार नाही परंतु या कॉन्फरन्सच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब खामगांवच्या सर्वच सदस्यांनी त्यांना नेमुन देण्यात आलेल्या समितींमध्ये उत्कृष्ट कार्य केले व अथक परिश्रम घेतले.
या कॉन्फरन्ससाठी 16 जिल्ह्यांतुन आलेले सर्व प्रतिनिधीं कार्यक्रमाचे करण्यात आलेले आयोजन, वेळेचे व्यवस्थापन, आदरातिथ्य, वाहतुक व्यवस्था, पार्कीग, भोजन व निवास व्यवस्था यामुळे भारावून गेले होते आणि त्यांनी सर्वांचे मनभरुन कौतुक केले. जातांना सर्वांच्या चेह-यावर समाधानाचे भाव ठळकपणे दिसुन येत होते. गजानन महाराज संस्थान शेगांव यांनी दिलेल्या सहकार्यामुळे सदर आयोजन सफल झाले म्हणुन ही बाब संपूर्ण रोटरी परिवारातील सदस्यगण त्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यास विसरलेले नाहीत.
Post a Comment