मराठा पाटील युवक समितीच्या कालवड शाखा नामफलकाचे अनावरण
शेगाव (जनोपचार न्यूज) :-मराठा पाटील युवक समिती संस्थापक अध्यक्ष गजानन ढगे पाटील यांच्या हस्ते दि. 13 डिसेंबर 2022 रोजी 78 वी शाखा कालवड ता.शेगांव येथे नामफलकाचे फीत कापून अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली या नंतर गावातील नागरीकांन वतीने उपस्थीत समितीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .यावेळी जिल्हा प्रवक्ते विठ्ठल अवताडे यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली. यांनातर संस्थापक अध्यक्ष गजानन दादा ढगे यांनी युवक समितीच्या कार्याची माहिती देऊन युवकांना संघटीत होण्याचे आवाहन करून युवकांनी उच्चशिक्षित होऊन समाज उन्नतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करून मार्गदर्शन केले.
जाहिरात ,👆👆👆फक्त १०० ₹ संपर्क 8208819438
सदर प्रसंगी समितीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील,जिल्हा सचिव मोहन घुईकर, जिल्हा संघटक अविनाश कुटे,शंकर कोळस्कार,सतीश लांजुळकर,खामगाव तालुका कार्याध्यक्ष राम पारस्कार, खामगाव तालुका उपाध्यक्ष रवी मिरगे,शेगांव तालुका उपाध्यक्ष प्रतीक मिरगे,नांदुरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मनस्कार, वैभव खराटे, शेगांव येथील अविनाश शेजोळे, शेगांव शहराध्यक्ष मुकेश गावंडे, भोटा येथील वैभव पारस्कार,शिवचारण पारस्कार,यावेळी कालवड शाखा अध्यक्ष पदी विशाल काळे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे,ज्ञानेश्वर र.काळे,सचिव गजानन काळे,मुख्य संघटक मंगेश वनारसे,संघटक परमेश्वर काळे,सदस्य सचिन काळे,गणेश काळे,विनायक काळे,पंकज काळे,पुरुषोत्तम काळे, तसेच गावातील बहुसंख्य युवक तसेच जेष्ठ नागरिक यावेळी ऊपस्थित होते*
Post a Comment