कुत्रीम अवयव व सहाय्यक साधणे वितरणासाठी ८०८ लाभार्थ्यांची निवड
खामगाव (जनोपचार)- दि खामगांव अर्बन को ऑप बँक लिमी. खामगांव व निवासी मूक व बधिर विद्यालय, खामगांव यांचे सयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन समारोह वि द्यालयात आयोजित करण्यांत आला होता . या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम एज्युकेशन सोसायटी, खामगांवचे अध्यक्ष डॉ. गोपाल सोनी हे होते. प्रमुख अतिथी खामगांव अर्बन को ऑप बँक लिमी. खामगांवचे मुख्य प्रबंधक सुधिर कुळकर्णी,संचालीका हातेकर मॅडम, कोरडे मॅडम, संचालक राजेन्द्रसिंह राजपुत, डॉ. अमितदे शमुख लॉयन्स क्लब संस्कृतीचे अध्यक्ष विरेन्द्र शाह हे होते. तसेच या कार्यक्रमालासं स्थेचे सचिव ब्रिजगोपाल भट्टड संचालक आकाश अग्रवाल, हे उपस्थितीत होते.
. या कार्यक्रमात दि खामगांव अर्बन को ऑप बँक लिमी. खामगांव यांचेक डुन गरजु विद्यार्थ्यांना ४ संच वैयक्तीक प्रोगामेबल श्रवण यंत्राचे वाटप करण्यांत आले.त सेच दि. ०५/१२/२२ व दि. ०६/१२/२२ रोजी निवासी मुक बधिर विद्यालयखा मगांव येथे खा प्रतापराव जाधव व अॅल्मीको मुंबई यांचे सौजन्याने दिव्यांग व्यक्तीना कुत्रीम अवयव व सहाय्यक साधणे वितरणाकरीता तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीरास आ आकाश फुंडकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, भागवत मॅडम, शालीग्राम पुड, समाज कल्याणका र्यालय जि.प.बुलडाणा तसेच खामगांव नगर परिषदचे उपकार्यकारी अधिकारी वशि वसेनेचे जिल्हा व तालूका पदाधिकारी व सदस्य यांनी भेट दिली. या शिबिरामध्येबु लडाणा जिल्ह्यतील ९०० पेक्षा जास्त दिव्यांगांची तपासणी करण्यांत येवुन ८०८ लाभार्थ्याना आवश्यकते नुसार कुत्रीम अवयव व सहाय्यक साधणे वितरणासाठी निवड करण्यांत आली. सदर दिव्यांगाना साहित्य वाटप लवकरात लवकर करण्यात येईल. असे खा प्रतापराव जाधव यांचे पी.ए. व ॲल्मीको मुबई याचे वतीने आलेल्या टीमने सांगितले आहे. सदर शिबीर यशस्वी करण्यांसाठी विद्यालयातील सर्व कर्मन्यांनी परिश्रम घेतले. अशी माहिती निवासी मूकबधिर विद्यालयाच्या वतीने देण्यात आली
Post a Comment