विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा बचत गटांना मदतीचा हात

 विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा बचत गटांना मदतीचा हात

पाच महिला बचत गटांना बारा लाखाचे कर्ज वाटप

खामगाव जनोपचार न्यूज:- विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या खामगाव शाखेने आज 26 डिसेंबर रोजी खामगाव तालुक्यातील पाच महिला बचत गटांना बारा लाख रुपयाचे कर्जाच्या स्वरूपात वाटप केले असून याद्वारे महिला बचत गट अंतर्गत व्यवहार पूर्ण करणार आहेत.



शाखा व्यवस्थापक आर आर पांडे, लोन ऑफिसर वर्षा सरकटे व्यवस्थापक पुष्पा पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. शासनाच्या निकषाप्रमाणे ईश्वरी महिला बचत गट रोहना,आर्यन बचत गट सजनपुरी ,जय शिवाजी महिला बचत गट , सावित्रीबाई फुले महिला बचत गट ढोरपगाव, सद्गुरु महिला बचत गट घाटपुरी या महिला बचत गटांना सदर धनादेश वितरित करण्यात आला



Post a Comment

Previous Post Next Post