प्रा सचिन सोनी यांच्या अथक प्रयत्नांतून

 शासकीय तंत्रनिकेतन खामगांवला महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण संचालकांची भेट



             खामगाव जनोपचार न्यूज:-   शासकीय तंत्रनिकेतन, खामगांव येथे  महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ अभय वाघ यांनी भेट दिली. यावेळेस त्यांचेसमवेत सहसंचालक उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे डॉ प्रमोद नाईक, मा.सहसंचालक अमरावती विभाग डॉ विजय मानकर व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष   हे उपस्थित होते. निमित्त होते प्रा सचिन सोनी यांच्या अथक प्रयत्नांतून नवनिर्मित भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सभागृह लोकांच्या वापरासाठी खुले करण्याचे तसेच संस्थेत नव्याने झालेल्या बांधकामांच्या अवलोकनाचे. संस्थेतील माजी विद्यार्थी संघटनेव्दारे अनेक विद्यार्थीपयोगी उपक्रम चालविले जातात जसे की गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी वार्षिक सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दोन प्रकारच्या शिष्यवृत्ती, वार्षिक निकांलावर आधारीत पुरस्कार व मेडल्स, त्यांना देण्यात येणारे अभियांत्रिकी साहित्य, पाठ्यक्रमिक पुस्तकांचे संच, थंडीत लागणारे ब्लॅंकेटस्, वैद्यकीय मदत, संस्थेत व मुलामुलींच्या वसतीगृहात लावण्यात आलेले वॉटर कुलर्स व त्यांची नियमित देखभाल, वृक्षसंवर्धन ईत्यादि कार्यांबद्दल मा.संचालक महोदयांनी माहिती जाणुन घेतली. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांव्दारे माजी विद्यार्थी संघटनेने बनविलेले अद्यावत कार्यालय, फर्निचर, संगणक व प्रिंटर ईत्यादि त्यांनी स्वतः पाहिले व येथील माजी विद्यार्थी संघटना महाराष्ट्रातील ईतर अभियांत्रिकी शिक्षण देणा-या संस्थांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरावे या शब्दांत त्यांनी प्रशंसा केली.


तसेच त्यांनी संस्थेत झालेले काही नवीन बांधकाम, नव्याने झालेले अंतर्गत रस्ते, मुलींच्या वसतीगृहाचा नव्याने बांधण्यात आलेला दुसरा मजला, मुलांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण, नवीन सुरक्षा रक्षक चौकी, विद्याथ्र्यांकरीता वाढविण्यात आलेल्या सोईसुविधा, संस्थेत झालेले वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ईत्यादि कार्याबाबत जाणुन घेतले व पाहणी केली.


सर्वप्रथम डॉ अभय वाघ आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री विरमणी साहेब यांनी नवनिर्मित भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वसरय्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर स्थापित त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले तसेच संघटनेव्दारे संस्थेत लावण्यात आलेल्या तिस-या वॉटर कुलरचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. सभागृहात संपन्न झालेल्या एका भव्य कार्यक्रमात वर्ग-1 ते वर्ग-4 आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते मंचावर विराजमान पाहुण्यांचे पुस्तक, शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वसरय्या यांच्या एका छोट्या पुतळ्याचे स्मृतीचिन्ह मा.संचालक डॉ अभय वाघ यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिमखाना उपाध्यक्ष         प्रा राजेश मंत्री यांनी केले. तद्नंतर प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी संस्थेत झालेल्या विकासकामांची प्रस्तावना सभेसमोर मांडली. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री विरमणी साहेब यांनी माजी विद्यार्थी संघटना करत असलेल्या विद्यार्थीपयोगी कार्याची माहिती उपस्थितांसमोर प्रस्तुत केली. सरतेशेवटी संचालक डॉ अभय वाघ  यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्वांना उद्देशून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार तांत्रिक शिक्षणाचे महत्व, त्यायोगे देशात वाढत असलेला जीडीपी व तांत्रिक शिक्षणांत गुणात्मकता वाढवुन तो आपण अजुन कसा उंचावु शकतो याचे खुप सुरेख व अभ्यासपूर्ण विवेचन सभेसमोर मांडले. कार्यक्रमाचे रसाळ संचालन प्रा गजानन पद्मणे यांनी केले तर आभार प्रदर्शन  प्रा राजेश मंत्री यांनी केले.


अत्यंत पुरातन व छोट्या गांवात असलेली शासकीय तंत्रनिकेतन खामगांव ही संस्था प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांचे नेतृत्वाखाली करीत असलेल्या उत्तरोत्तर प्रगतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व जिमखाना समितीतील विद्यार्थी प्रतिनिधींनी अथक प्रयत्न केले.

Post a Comment

Previous Post Next Post