श्री संत पाचलेगावकर महाराजांच्या शोभायात्रेचे फरशी मित्र मंडळा तर्फे जंगी स्वागत।।
खामगाव जनोपचार:- स्थानिक मुक्तेश्वर आश्रम येथे दरवर्षी निर्गुण पादुका महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येत असते या उत्सवा दरम्यान महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती येथे लक्ष वेधणारी असते। मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता,पण यावर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला असून, भक्तांमध्ये उत्साह दिसून येत होता,दि.२० डिसेंबर रोजी उत्सवाचा मुख्य दिवस होता यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती,सदर पालखीची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांनी,महाराजांच्या नावाचा जयघोष करीत,टाळ मृदंगाच्या निनादात,फरशी येथे आली असता,परंपरे नुसार फरशी मित्र मंडळातर्फे आकर्षक रांगोळी काढून,फटाक्यांची भव्य दिव्य अशी आतिषबाजी करत,ढोल ताशांच्या निनादात, जंगी स्वागत करण्यात आले यावेळी सर्व प्रथम महाराजांच्या प्रतिमेचे विधिवात पूजन करून, मंडळाचे गोपाल अग्रवाल, प्रकाश वानखेडे,श्रीकांत मिश्रा,राजू पुरवार,गणेश देशमुख,रवि आनंदे,रवि जोशी,निखील वानखेडे,गौरव राठौड,यांनी पुष्प हार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले, फरशी मित्र मंडळातर्फे मागील पंधरा वर्षापासून आज पावेतो ही स्वागताची परंपरा जोपासली जात आहे, पालखीत सहभागी भावी भक्तांना यावेळी कॉफी व पाण्याचे वितरण करण्यात आले ,महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण फरशी परिसर भक्तीमय झाले होते,यावेळी मंडळाचे तकाराम निंबाळकर,रवि शर्मा, विजय देवताळू,करण ठाकूर, शुभम पालीवाल,जयेश जाधव,पिंटू जामोदे ,राहुल जाधव ,राजू बखतरीया, कुणाल ठाकूर, विजू निंबाळकर, प्रसाद नटकूट, रतन चोपडे,सागर मोडकर, राहुल तुपकरी,राहुल मिश्रा, ओम शर्मा,श्रवण जाधव,जय राणा, वेदांत खराटे,रोहन दलाल,दिपक आसरकर,यश जाधव, राजू बखतरीया,प्रयास शेटटे सह फरशी मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते।
Post a Comment