श्री सरस्वती इंग्लिश स्कूल व स्वामी विवेकानंद महाविद्यालय अंत्रज येथे श्री .संताजी महाराज पुण्यतिथी साजरी

 श्री सरस्वती इंग्लिश स्कूल व स्वामी विवेकानंद महाविद्यालय अंत्रज येथे श्री .संताजी महाराज पुण्यतिथी साजरी 

 डॉ.भूषणजी कर्डिले  यांचा वाढदिवस संस्थेच्या वतीने  शिक्षणासाठी  विद्यार्थी दत्तक घेऊन साजरा !


*घरकुल मिळालंच पाहिजे....*

https://youtu.be/fPEEUaCfDbI


 खामगाव janopchar:-   येथून जवळच असलेल्या  श्री. सरस्वती इंग्लिश स्कूल व स्वामी  विवेकानंद महाविद्यालय अंत्रज येथे आज 21 डिसेंबर ला  श्री. संत शिरोमणी श्री संताजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली   श्री संताजी महाराज यांची जयंती ते पुण्यतिथी निमित्त अमृत महोत्सव साजरा  यावेळी  करण्यात आला . 

श्री .संताजी महाराज  नावाने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली तर  दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ होईल या उद्देशाने    श्री.संताजी  महाराज जन्मोत्सव  

  तसेच भूषणजी कर्डिले महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महासचिव महाराष्ट्र राज्य    यांच्या  वाढदिवसाचे  औचित्य साधून विविध कार्यक्रमासह सदर योजनेचा शुभारंभ करण्यात  आला .  चालु शैक्षणिक सत्राकरीता  दोन विद्यार्थ्यांचे पालकत्व  सांभाळण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने  घेण्यात आला .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत चोपडे  यांनी सांगितले . तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आराख यांनी महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकत महापुरुषांच्या नावाने विविध योजना आहेत,त्या योजना राबविण्याचा संस्थेचा संकल्प आहे , नवीन योजना व  स्पर्धा परिक्षा ,खेळ ,विविध कार्यक्रमाचे आयोजन संस्थेमध्ये घेण्यात येणार आहेत , शाळेच्या  मुख्याध्यापिका सौ. भाग्यश्री चोपडे यांनी महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .संस्थेचे मार्गदर्शक निलेश चोपडे यांनी देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सागितले तर  जीवनासोबतच संस्कृती देखील जोपासली पाहिजे तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक चे निळकंठभाऊ सोनटक्के होते. कार्यक्रमांचे आयोजन  प्रा.कडूबा पैठणे यांनी तर  सुत्रसंचालन कु .अनुराधा बगाडे यांनी केले ,   तेनस्कर मॅम, महाले मॅम, सौ सविता वाघ शिक्षक अनिरुद्ध हिवराळे  व कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी अथक परिश्रम सर्व कर्मचारी यांनी घेतले  , संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार  मानण्यात  आले .

Post a Comment

Previous Post Next Post