उद्या खामगावात उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर हल्लाबोल आंदोलन
खामगाव:- महाराष्ट्राचे आराध्यदैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मागील काही दिवसांपासून महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, व भाजपाचे नेते सातत्याने चुकीचे वक्तव्य करून त्यांचा व महाराष्ट्राचा घोर अपमान करीत आहेत.
राज्यातील शिंदे _ फडणवीस ईडी सरकारवर जनतेचा तिळमात्र विश्वास राहिलेला नसल्याने महाराष्ट्राच्या सिमालगत असलेली अनेक गावे बाजूच्या राज्यात जाण्याची भाषा बोलत आहे. हे अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक आहे. या संदर्भात राज्यसरकारची स्पष्ट भुमिका दिसून येत नसल्याने राज्यातील जनतेच्या मनात तिव्र आक्रोश निर्माण झालेला आहे. तसेच काही दिवसां अगोदर *भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल अपवादात्मक प्रतिक्रिया दिल्याबद्दल जाहीर निषेध करण्यासाठी खामगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या वतीने मा. आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात बुधवार दिनांक १४/१२/२०२२ रोजी सकाळी ११.०० वा उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर हल्लाबोल आंदोलन* करण्याचे ठरविले आहे.
तरी खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी नगरसेवक, जि. प व प. स सदस्य, कृ. ऊ .बा. स चे प्रशासक, विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
*◆ विनीत ◆*
खामगाव शहर व तालुका काँग्रेस कमिटी ,शेगाव तालुका काँग्रेस कमिटी.
*दिनांक : १४ डिसेंबर २०२२*
*वेळ: सकाळी ११.०० वा.*
*ठिकाण : उपविभागीय अधिकारी कार्यालय , टावर चौक ,खामगांव*
Post a Comment