खामगाव (जनोपचार )खामगाव सह बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे असा मेसेज आता सोशल मीडिया च्या अनेक ग्रुप वरून व्हायरल होत आहेत हा मेसेज कोणी तयार केला याबाबत कुणाला माहिती नसले तरी डफळे बजाव आंदोलनाचा इशारा याद्वारे देण्यात आला आहे सदर मेसेज मध्ये नमूद करण्यात आले आहे की.....,मा. साहेब 👇👇👇👇
सप्रेम नमस्कार !
महोदय,
खामगाव शहराचे कर्तव्यदक्ष अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक एस. श्रवन दत्त यांच्या कालावधीत खामगाव मतदार संघासह, त्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद होते. त्यांची खामगाव येथून बदली झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदार संघात वरली - मटका, ताजी वरली, चकरी वरली, एक्का बादशा जुगार हे मोठ्या प्रमाणात खुलेआम पणे सुरू आहेत. तसेच अवैध रेती वाहतूक, गुटखा तस्करी सुद्धा खुलेआम सुरू आहे. यामुळे शेतकरी , शेतमजूर व सामान्य जनता लालसेपोटी बरबाद होत आहे. ही बाब मनाला वेदना देणारी आहे.
म्हणून आपण खामगाव शहरासह, खामगाव तालुका , शेगाव तालुका व शेगाव शहरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे आदेश द्यावे. अन्यथा जनतेच्या हितासाठी व गावात शांतता कायम ठेवण्यासाठी तीव्र आंदोलन, क्रमश: सर्व वरिष्ठांच्या कार्यालया समोर " डफडे बजाओ " आंदोलन, गाव बंद आंदोलन केले जाईल.
न्याय न मिळाल्यास सक्षम पुराव्यानिशी न्यायालयात दाद मागितली जाईल. म्हणून जनहितार्थ सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे व कृपया केलेली कारवाई कळवावी. ही विनंती.
Post a Comment