गॅस सिलेंडर च्या घरपोच सेवेवर ज्यादा पैसे घेतल्यास कारवाही
■ नितेश मानकर ■
खामगाव (जनोपचार) गॅस सिलेंडर घरपोच सेवेच्या नावावर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे "भाडा" च्या नावावर पैसे उकडल्या जात आहेत मात्र याकडे जिल्हा पुरवठा विभागासह स्थनिक प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने पाणी कुठं मुरतंय? हे कळत नाही. घरगुती गॅस सिलेंडर च्या घरपोच सेवेसाठी ना कोणी जनजागृती करते ना प्रशासकीय लेव्हलवर बैठक झाल्याचे दिसते .औरंगाबाद च्या पुरवठा अधिकाऱ्यांनी मात्र जनतेची होणारी लुबाडणूक थांबचायचा प्रयत्न केला असून पुढारी ने त्याबाबत वृत्त प्रकाशित केलंय त्या रुत्ततात अस म्हटलंय की,
गॅस एजन्सींनी ग्राहकांना घरपोच सिलिंडर सेवा मोफत देणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहकांकडून जादा पैसे घेण्यात येऊ नये, तसे झाल्यास वितरकाविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी (डीएसओ) वर्षाराणी भोसले यांनी एजन्सींना दिला आहे. तसेच गॅस कंपन्यांनी
यासंदर्भात चौकशी करावी, असे आदेशही दिले आहेत.
गॅस एजन्सीकडून ग्राहकांची लूट सुरूच आहे. घरगुती गॅस
सिलिंडर घरपोच सेवा देण्यासाठी एजन्सीधारकांनी खासगी वितरक नियुक्त केले आहे. हे वितरकएकाने ग्राहकांकडून २० ते ३० रुपये जास्तीचे घेत आहेत. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत भोसले यांनी बीपीसीएल,
आयओसीएल, एचपीसीएल या
तिन्ही गॅस कंपन्यांच्या व्यवस्थापकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
शहरातील एकाही गॅस एजन्सींनी
घरगुती गॅस सिलिंडरची घरपोच सेवा देण्यासाठी जास्तीचे शुल्क वसूल
करू नये, तसे झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. सर्व गॅस एजन्सीधारकांची बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात, असेही म्हटले आहे. निदान बुलढण्यात बसलेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तरी अनुकरण करावे अशी अपेक्षा अपेक्षित आहेत
Post a Comment