खामगाव जनोपचार - महाराष्ट्र विधान
परिषदेच्या अमरावती विभाग
पदवीधर मतदार संघाच्या आगामी
निवडणुकीसाठी मतदार नोंदणी
सुरु
असून निवडणूक विभागाने प्रथम
दिलेल्या मुदतीत खामगाव
तालुक्यात ३ हजार ७७१
पदवीधरांनी मतदार नोंदणी अर्ज
भरून दिले आहेत. याकरीता
ऑफलाईन आणि ऑनलाईन
नोंदणी सुरुच असून ज्या
पदवीधरांची नोंदणी बाकी असेल
त्यांनी मतदार विभागाशी संपर्क
साधल्यास त्यांची नोंदणी होवू
शकते.
यांना होता येईल पदवीधर मतदार
जी व्यक्ती भारताची नागरीक आहे आणि त्या मतदारसंघातील
सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती व्यक्ती १ नोव्हेंबर २०२२
पूर्वी (अर्हता दिनांक) किमान तीन वर्ष भारतातील विद्यापीठाची
एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समकक्ष असलेली अर्हता
धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती पदवीधर मतदार यादीत
नाव नोंदवू शकते. याकरीता मतदार नोंदणी अर्जासोबत पदवी किंवा
पदवीच्या अंतीम वर्षाची गुणपत्रिकेची झेरॉक्स, आधारकार्ड व एक
फोटो जोडणे आवश्यक आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या प्रत्येक
निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाकरीता
नव्याने मतदार यादी तयार करण्यात
येत असते. त्यामुळे सर्वच पदवीधर
मतदारांना नव्याने नाव नोंदणी करणे
आवश्यक असते. याकरीता बुलढाणा
जिल्ह्यात पदवीधर मतदार नोंदणी
मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
निवडणूक विभागाने यासाठी ७
नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत
दिली होती. यादरम्यान खामगाव
तालुक्यात ३ हजार ७७१ पदवीधरांनी मतदार नोंदणी अर्ज भरुन दिले
आहेत. यानुसार २३ नोव्हेंबर रोजी
प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात
येणार आहे. त्यावर ९ डिसेंबरपर्यंत
हरकती घेता येणार आहेत. असे
असले तरी अद्याप ज्यांनी मतदार
नोंदणी अर्ज भरलेला नसेल त्यांना
अर्ज भरता येणार आहे. पदवीधर
मतदार नोंदणी करीता ऑफलाईन
आणि ऑनलाईन अर्ज स्वीकारणे
सुरुच असल्याची माहिती प्राप्त
झाली. त्यामुळे ज्यांची नोंदणी बाकी
असेल त्यांनी निवडणूक विभागात
संपर्क साधणे आवश्यक आहे. ३०
डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी
प्रसिध्द करण्यात येणार आहे.
Post a Comment