उद्या पासून चार दिवस बँकांना सुटी

 जनोपचार :- नोव्हेम्बर दुसरा आठवडा उद्यापासून म्हणजेच 7 नोव्हेंबरपासून सुरू होईल. या संपूर्ण महिन्यात एकूण 10 दिवस बँक सुट्ट्या असतील ज्यात शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे. मात्र यापैकी 7 ते 13 नोव्हें बर हा आठवडा असा आहे, ज्यामध्ये एकूण चार दिवस बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.



मार्गदर्शक सूचनांनुसार, बँकांच्या सर्व सार्वजनिक सुट्ट्या तसेच प्रादेशिक सुट्ट्या देखील आहेत. सर्व सरकारी आणि खाजगी बँकांना या सुट्ट्या कायम आहेत. दर महिन्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये शनिवार आणि रविवारी वीकेंड म्हणून सहा दिवस बँका बंद राहतील. 7 ते 13 नोव्हेंबर दरम्यान शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्ट्या आहेत. याशिवाय दोन सुट्याही आहेत.8 तारखेला गुरु नानक जयंती/कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयझॉल, भोपाळ, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, कानपूर, चंदीगड, कोलकाता, लखनौ, मुंबई, बेलापूर, नागपूर, भुवनेश्वर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, जम्मू, शिमला आणि श्रीनगर नोव्हेंबर 2022 इत्यादी सर्व शहरांमध्ये राहतील. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रविवारी बँका बंद राहतील. तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देखील बँकेला सुट्टी असेल. चार रविवार, दोन शनिवार व्यतिरिक्त 8, 11 आणि 23 नोव्हेंबरला सुट्टी असेल.

Post a Comment

Previous Post Next Post