श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप
खामगाव(नितेश मानकर) जनोपचार:- सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २२ वर्षा पासून मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे "मुख मे हो राम नाम राम सेवा हाथ मे " हे ध्येय घेऊन ज्या लोकांच्या डोक्यावर छत नाही अंगावर पुरेसे कपडे नाही खायला दोन वेळ चे अन्न नाही अशा समाजातील उपेक्षिता प्रती आपले पण काही देने लागते हा उद्देश समोर ठेवून
गोर गरीबांना नेहमी मदत करणारे मुन्ना भाऊ शर्मा यांनी सन २००० मध्ये हा. भ. प.गोपाल महाराज रेवस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळाची स्थापना केली भजनाच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज पर्यंत मंडळाच्या माध्यमातून निस्वार्थ अखंडपणे अनेक उपक्रम सुरू आहेत शहरात गेली १० दिवसापासून वाढती थंडी पाहुन दरवर्षी प्रमाणे आज दिं २५ नोव्हेंबर शुक्रवार रोजी रात्री १० वा शहरातील विविध ठिकाणी जाऊन जे गरजवंत उघड्यावर झोपले आहे अशा ठिकाणी जाऊन त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले या वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद भाऊ सुकाळे. अरूण भाऊ कडवकर. दिलीप भाऊ झापर्डे. भागीरथी बाई शेळके. सुशिला बाई आवलकर. ईन्दुबाई गायकवाड. आशा बाई अंधारे. मंगला बाई बावस्कर. जयाबाई सुकाळे. शकुंतला बाई ढवळे. संगिता बाई वाघोळे. पुष्पा बाई पवार. जयश्री ताई झापर्डे. वंदना ताई शेळके. वर्षाताई देशमुख. शालिनीताई देशमुख. व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली
Post a Comment