खालील लिंक वर पहा व्हिडीओ
https://youtu.be/ETJcd2a9jG4
खामगाव(जनोपचार ब्रेकिंग)मलकापूर विधानसभा मतदार संघात सलग २५ वर्म आमदार म्हणून विकासपर्व गाजविणारे भाजपा नेते चैनसुख संचेती याच्या वाहनाला समोरुनयेणाऱ्या बसने धडक दिली. या अपघातात चैनसुख संचेती, त्यांचे पुतणे यश संचेती व चालक निलेश राजपूत सुखरुप असल्याची माहिती संचेती यांनी प्रसार माध्यमांशी भ्रमणध्वनीवरबोलतांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्यांची भेट घेवून बोथा मार्गे अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियासाठी बोथा मार्ग जात असतांना समोरुन नेणाऱ्या बसने त्यांच्या वाहनाला'धडक दिली. त्यांचे चालक निलेश राजपूत यांच्या समयसुचकतेने आम्ही सर्व सुखरुप बचावलो, असे त्यांनी सांगितले.
Post a Comment