*साडीच्या झोक्याचा फास लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू*


*साडीच्या झोक्याचा फास लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू*


बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घरात खेळतांना घडली घटना

खामगाव (जनोपचार) - 

झोक्याचा फास लागून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना स्थानिक जुनाफैल भागात आज  घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या भागातील शंकर प्रकाश शिंदे हा मुलगा सकाळी पाणी भरत होता. त्यानंतर तो घरात जावून साडीच्या झोक्यावर खेळायला लागला. मात्र यावेळी त्याला झोक्याचा फास लागला. सदर घटना लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला सोडवून त्वरित सामान्य रुग्णालयात नेले. मात्र यावेळी डॉक्टरांनी तपासणी करुन शंकर शिंदे याला मृत घोषित केले. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली...


घरातील सर्व मंडळी लग्नाला गेली होती

मयत शंकर हा इयत्ता नववीत शिकत होता. खामगाव शहरातील जुना फैल भागात शिंदे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. आई-वडिलांसह घरातील सर्व मंडळी नातेवाईकांच्या लग्नासाठी अकोला येथे गेले होते. यावेळी शंकर आणि त्याचे वृद्ध आजी आजोबा तिघेच घरी होते.

शंकरच्या घराशेजारी मंदिराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामावर पाणी मारण्याचे काम करुन शंकर घरी आला. त्यानंतर खोलीत दोर बांधून तो झोका खेळत होता.

Post a Comment

Previous Post Next Post