खामगाव (नितेश मानकर)
8208819438,9422883802
राधेश्याम उपाख्य भाईजी हे नावच मुळात प्रमाणितेचे प्रतीक आहे मग त्यांच्या अखत्यारीत काम करणारे हेही प्रमाणिक असणारच आणि प्रामाणिक असण्याचा आणखी एक पुरावा नुकत्याच एका घटनेतून समोर आलंय .....
बुलढाणा अर्बन च्या खामगाव शाखेचे कर्मचारी रवींद्र चव्हाण यांना शाखा अटाळी येथे रोखपाल पदासाठी डेप्यूटेशन दिले होते शाखा अटळी येथे ते साध्य कार्यरत आहेत दिनांक 22 ओक्टॉम्बर 22 रोजी दुपारच्या सुमारास शाखेचे खातेदार श्री संतोष तलवारे यांनी त्यांच्या बचत खातयामधये जमा करण्यासाठी रुपये 28 हजार स्लीप सह त्यांच्या माणसाकडे दिले होते. त्या व्यक्तीने रोखपाल श्री.चव्हाण यांच्याकडे ती रक्कम आणि स्लीप दिली.रोखपल यांनी रक्कम मोजली ,स्लीप वर नोटांचा तपशील 28000/- चा होता.त्यांनी रक्कम आणणाऱ्या व्यक्ती ला विचारले रक्कम किती आहे? तर तो म्हणाला 28000/-रू. आणले .
रोखपाल यांनी ताबोडतोब शाखा व्यवस्थापाक सौ.वर्षा पळसोदकर यांना सांगितले की रोखरकमेत 10000/-जास्त आहे.
सौ.पळसोदकरयांनी शहानिशा करण्यासाठी खातेदार श्री तलवारे यांना फोन करून विचार ले की रोख किती पाठवली? श्री.तलवारे पाठविले रू. 28000/-पाठविले असे सांगितले. त्यावेळी श्री चव्हाण यांनी रोख 10000/-जास्त आल्याचे सांगीतले असता खातेदार तलवारे यांनी श्री.चव्हाण यांना धन्यवाद देऊन आभार मानले.
बुलडाणा अर्बन च्या खामगाव विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांनी देखील रोखपाल चव्हाण यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक करत शबासकी दिली.
बुलढाणा अर्बन च्या मेहनती कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा नेहमीच बघावयास मिळतो याचा प्रत्यय चव्हाण यांच्या रुपाने पुन्हा एकदा अनुभवयास मिळाला असून त्यांच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment