*राष्ट्रीय एकता दिनानिमित्त खामगाव तालुक्यात विविध ठिकाणी एकता दौड चे आयोजन*
खामगाव दिनांक 31 ऑक्टोबर::-
31 ऑक्टोबर या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या केल्या जात असणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनी खामगाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी *"एकता दौड"* चे आयोजन करण्यात आले होते..
यामध्ये प्रामुख्याने तहसील कार्यालय खामगाव,
नगरपरिषद खामगाव, पंचायत समिती खामगाव,
पोलीस स्टेशन खामगाव शहर,
तालुका क्रीडा अधिकारी खामगाव यांच्यासोबतच
बार कौन्सिल खामगाव,
प्रेस क्लब खामगाव,
इंडियन मेडिकल असोसिएशन खामगाव,
तरुणाई फाउंडेशन,
गुरु गोबिंदसिंगजी ट्रस्ट खामगाव,
नॅशनल हायस्कूल खामगाव,
एनसीसी खामगाव
आदींनी एकता दौड काढून सक्रिय सहभाग नोंदवला..
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथ घेण्यात आली व राष्ट्रगीताने नगरपरिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती एकता दौडचा समारोप करण्यात आला...
याप्रसंगी तहसीलदार,मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी,शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,तालुका क्रीडा अधिकारी,बार कौन्सिलचे अध्यक्ष यांचे सोबत विविध कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी, वकील, डॉक्टर्स ,व्यावसायिक, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Post a Comment