चोर गेले निघून अन रात्र काढली जागून

 चोर गेले निघून अन रात्र काढली जागून "आला आला चोर आला?"



मेहकर (जनोपचार ब्युरो रिपोर्ट) चोर आला, चोर आला अशी माहिती गावात पसरताच गावकरी जागृत झाले आणि अक्खी रात्र जागून काढली ही सत्य घटना आहे मेहकर तालुक्यातील डोनगाव पोस्टे हद्दीतील घाटबोरी येथील!

गेल्या 10-12 दिवसांपासून या गावात चोरांची दहशत पसरली आहे, दुचाकी सह चोरी च्या घटना येथे घडल्याने गावकऱ्यांनी रात्री पहारा देण्याचे ठरविले, दातरोज चार पाच लोक रात्रपाळी करून इतरांच्या सौरक्षणाचे काम सुरू झाले , पोलिसही अधून मधून गस्त घालू लागले मात्र चोर आपला सावज गाठत आहे , काल रात्री देखील 3/4 इसम रात्री च्या अंधारात गावकऱ्यांनी पाहिले मात्र ओरड होताच त्या इसमांनी पळ काढल्याचे गावकरी सांगतात।एकंदरीत चोर गेले निघून अन रात्र काढली जागून अशी अवस्था गावकाऱ्यांची झाली, प्रकार काहीही असो मात्र घाटबोरी गावात चोरांची दहशत असल्याने महिनाभर पोलिसांची नेमणूक करावी अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहे

Post a Comment

Previous Post Next Post