कंपणींशी सलगी करणाऱ्या लोक प्रतिनिधींना ओळखा

जेएसडब्ल्यू कंपनीशी सलगी साधणाऱ्या गडब, डोलवी गावातील लोकप्रतिनिधींना आगामी निवडणूकीत हद्दपार करणार ... ; ग्रामस्थांचा निर्धार !!



गडब (जनोपचार) अवंतिका म्हात्रे

     पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या गडब आणि डोलवी ग्रा पं च्या निवडणूका लवकरच होणार आहेत . सदर निवडणूकीत कंपनी समर्थक लोकप्रतिनिधी निवडणूक लढविणार आहेत मात्र त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये . लोकांच्या भावना कंपनी पर्यंत पोहोचवण्यासाठी या लोकप्रतिनिधींचा वापर कंपनी प्रशासन करू इच्छित आहे . त्यांच्या मध्यस्तीने सर्वसामान्य लोकांचे वस्त्रहरण करण्याचा विडा कंपनीने उचलला आहे . ज्या कंपनीच्या भरोश्यावर लोकप्रतिनीधी निवडणूका लढवत आहेत आणि लोकांची दिशाभूल करित आहेत आशांना आगामी निवडणूकीत कोणत्याही प्रकारे थारा न लावता ग्रा.पं. मधून बाहेर फेकावे अशी लोकांची मागणी आहे .

    सदर निवडणूकीत अशा लोकप्रतिनिधींना कंपनी प्रशासन मदत करित आहे . त्या जोरावर हे लोक प्रतिनिधी निवडणूका लढवत आहेत गावात कशी फूट पडेल याची दक्षता कंपनी कडून घेतली जात आहे . सर्वसामान्य लोकांच्या विशेषकरून कंपनीच्या विरोधात असणाऱ्या लोकांबाबत महत्त्वाची माहिती हे लोक प्रतिनिधी कंपनीला कळवीत आहेत . त्यानुसार जे एस . डब्ल्यू कंपनीचे पदाधिकारी लोकांशी वागत आहेत .

       त्यामुळे आगामी ग्रा पं . च्या निवडणूकीत गडब आणि डोलवी येथिल जनतेने दक्षता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post