खामगाव मध्ये दादागिरी वाढतेय....?
एक विरुद्ध गुन्हा तर आरोपी जखमी
खामगाव: खामगाव मध्ये दादागिरी वाढीस लागली असून पोलिसांनी अश्या व्यक्तींच्या नांग्या ठेचाव्यात अन्यथा डोकेदुखी वाढू शकते, कारण दुकानात घुसून 5 हजाराची मागणी करत दुकानदाराला दमदाटी करण्याचा प्रकार नुकताच समोर आला तर घटनेतील आरोपी हा जखमी झाला आहे.नेमकं प्रकरण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहे
या बाबत असे की, फिर्यादी येथील प्रतिष्ठित नागरिक लॅक्समन आयलानी यांना आरोपी निखिल शर्मा याने तुमच्या आठवडी बाजरातील देशी दारु च्या दुकानाबाबत तक्रार आहे तेथे लोक लघवी करतात असे
बोलुन दुकानामध्ये येउन अश्लील शीवीगाळ केली व दुकानाची तक्रार टाळायची असेल तर 5000 रु. दे असे धमकावु लागला नकार दिला असता लोटपाट करुन हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच मुलगा व भाउ यांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील लोटपाट केली. व मुलगा हीतेश याचे बोटाला मार लागुन नख तुटले आहे. अश्या आशयाच्या तक्रारी वरून खामगाव शहर पोलिसांनी निखिल शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तपास सुरू आहे,
Post a Comment