घटना :छोटा हत्ती पलटी होता होता वाचला!!

 खराब रस्त्यामुळे "छोटा हत्ती" पलटी होता होता वाचला



खामगाव (जनोपचार) खामगाव- चिखली मार्गावरील आंत्रज पुला जवळ अत्यंत खराब रस्ता असल्यामुळे दररोज किरकोळ अपघात होतात . वाहन चालकाला तर वाहन कसे चालवावे हेच कळत नाही , खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच या ठिकाणी कळत नाही 

आज रात्री 8:30 च्या सुमारास एक आरो प्लांट ची छोटा हत्ती गाडी पलटी होता होता वाचली, खड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्या कडेला गवतात गेले सुदैवाने वाहन पलटी झाले नाही मात्र वाहनाचे नुकसान झाले


Post a Comment

Previous Post Next Post