5 जी सुरू झालं पण सतर्क रहा जर हे विचारलं तर


जनोपचार (नितेश मानकर)
 मुंबई : देशात काही ठिकाणी ‘5- जी इंटरनेट’ सेवा सुरू झाली आहे. अधिक वेगवान नेट सुविधा देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. मात्र ही सेवा सुरू झाल्यावर फसवणूक करणारे सायबर भामटे कामाला लागले आहेत.
संपादक नितेशजी मानकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

माहिती आणि तंत्रज्ञान प्रगत झाल्याने एका क्लिकवर सर्व काही माहिती, सेवा मिळते. डिझिटल क्रांतीने जग आपल्या मुठीत आलेलं आहे. त्यात स्मार्टफोन जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. मात्र जेवढे प्रगत तंत्रज्ञान तेवढीच फसवणूक होण्याची शक्यता असते, यात शंकाच नाही. त्यामुळे आपण डीजीटल साक्षर असणे गरजेचे आहे. देशात आता ‘5 -जी इंटरनेट’ सेवा काही ठिकाणी सुरू झाली आहे.

कुंडी लगाले सय्या, तुजको जन्नत दिखाती…सावधान, तरुणीचा व्हिडिओ कॉल पडेल महागात!

5- जी’ सुविधेने आपली इंटरनेट स्पीड वाढणार आहे. मात्र, या सेवेच्या नावावर काही भामटे सायबर गुन्ह्यात तरबेज असल्याने आपली फसगत होण्याची शक्यताही वाढली आहे. आपल्याला 4 जी इंटरनेट सेवा ‘5 -जी’ मध्ये अपडेट करून देतो, असे फोन, मॅसेज किंवा लिंक आली तर खात्री करणे गरजेचे आहे. सध्या अश्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ५ जी इंटरनेट सुविधा अपडेट करण्याबाबत लिंक आली, तर याकडे दुर्लक्ष करा, अन्यथा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक फसवणुकीला सामोरे जाण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते.

कशी घ्याल खबरदारी

आपल्याला जर ‘5 -जी’ इंटरनेट सेवा अपडेट करून देतो असा फोन, मेसेज किंवा लिंक आली तर त्यावर लगेचच विश्वास ठेवू नका आपल्या जिल्ह्यात ही सेवा सुरू आहे का? याची खात्री करून घ्या, आपण ज्या कंपनीचे सिम कार्ड वापरता त्याच्या अधिकृत विक्री प्रतिनिधीशी किंवा कस्टमर केअरशी बोलूनच, सेवा अपडेट करण्याची प्रक्रिया करा अन्यथा आपले महत्त्वाचे डिटेल्स घेऊन फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही टाळा
सध्या व्हॅट्सऍपवर तरुणीच्या नावाने चॅटिंग आणि नंतर व्हिडिओ केला जातो. ऑनलाईन सेक्सच्या नावावर लोकांना फसवून नंतर ब्लँकमेल करून उकळले जातात. असे नंबर ब्लॉक करा. सिम ब्लॉक झाले , नवीन क्रेडिट कार्ड, वीजबिल थकले, मोबाईल टॉवरसाठी जागा भाड्याने हवी, व्यवसाय फ्रेन्चायसी अशा बतावण्या करून आपली आर्थिक लुबाडणूक केली जाणवू शकते. अश्या गोष्टीपासून सावध राहा, किंवा जाणकार आणि विश्वासू व्यक्तीशी संपर्क करून योग्य माहिती मिळवा

Post a Comment

Previous Post Next Post