आता हे तर हद्द झाली... घरात आढळले देशी-विदेशी दारूचे खोके.. डीबी पथकाचा छापा : 24 हजाराची दारू जप्त
जनोपचार न्यूज नेटवर्क: - शहरातील तलाव रोड भागात असलेल्या सिंधी कॅम्प मध्ये एकाच्या घरात देशी विदेशी दारू असल्याच्या माहितीवरून आज शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने छापा टाकला. यामध्ये 24 हजार रुपये किमतीचे देशी विदेशी दारू पोलिसांना मिळून आली. लकी सुरेश बुलानी असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
إرسال تعليق