इयत्ता दहावी मध्ये 2008 मध्ये एकत्र असलेल्या विद्यार्थ्यांचा पळशी येथे गेट-टुगेदर



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- पळशी बुद्रुक येथे जिल्हा परिषद हायस्कूल मधील इयत्ता दहावीची 2008 च्या गेट टुगेदर  चा कार्यक्रम महात्मा फुले मंगल कार्यालय पळशी बुद्रुक येथे आयोजित केलेला होता. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री पंदे सर  उपस्थित होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून काळे गुरुजी,खोंदील सर, बोराडे सर गायकवाड मॅडम,वळवी मॅडम, कावळे सर,गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील पती संजय सुरवाडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अतुल भाऊ ठोसरे आणि पल्हाडे बाबूजी सुनील भाऊ अकर्ते उपस्थित होते. तसेच इयत्ता दहावी 2018 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले नंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश जुमळे यांनी केले.त्यानंतर इयत्ता दहावी मधील 2008 चे मित्र-मैत्रिणी यांनी आपला परिचय देऊन आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर मंचावर उपस्थित काळे गुरुजी, बोराडे सर, गायकवाड मॅडम, संजय सुरवाडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले पंदे सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला इयत्ता दहावी 2008 बॅचमधील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आनंद भास्कर ठोसरे यांनी केले अशी माहिती शिवा वनारे पाटील यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post