स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!
नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवार, दि. ४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची अत्यंत महत्त्वाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी मागील तारखेला होऊ शकली नाही. हे प्रकरण कोर्टाच्या २९व्या क्रमांकावर होते, मात्र कोर्ट क्रमांक ३ मध्ये दुपारी १ वाजेपर्यंतच कामकाज चालणार असल्याने फक्त आठव्या क्रमांकापर्यंतचीच प्रकरणे ऐकली गेली.
सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांचे वकील आणि केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पुढील सुनावणीसाठी ४ मार्च ही तारीख मागितली होती. यावर कोर्टाने विचार करू असे सांगितले, मात्र तारीख निश्चित झालेली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती न्यायालयाकडे करण्यात आली. तर ओबीसी आरक्षण असो किंवा नसो मात्र निवडणुका व्हाव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
Post a Comment