सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस मध्ये क्रीडा महोत्सव संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- वसुंधरा बहुद्देशीय सामाजिक संस्था द्वारा संचालित सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे क्रीडा स्पर्धा दिनांक 13 फेब्रुवारी ते 15फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आल्या. त्यामध्ये विविध खेळ जसे क्रिकेट, कब्बड्डी, बॅडमिंटन त्यामध्ये पॉलीटेक्निक आणि इंजिनीरिंग च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्पर्धेला रंगत आणली. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सागर दादा फुंडकर हे लाभले होते.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती इंजिनीरिंग कॉलेज चे प्राचार्य डॉ अनंत जी कुलकर्णी, उप प्राचार्य डॉ. अशोक कंकाळे पॉलीटेक्निक च्या प्राचार्या प्रा. चोपडे मॅडम, डॉ पिंगळे सर आणि सर्व शाखा प्रमुख तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.तीन दिवसीय महोत्सवामध्ये क्रिकेट मध्ये इलेक्ट्रॉनिक्स संघाने बाजी मारत विजेता संघ ठरली तसेच उपविजेता म्हणून कॉम्प्युटर संघ घोषित झाला. कब्बड्डी मध्ये सिविल संघाने दबदबा कायम ठेवत विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आला तर उप विजेता संघ म्हणून इंजिनीरिंग संघ घोषित करण्यात आला.बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पॉलीटेक्निक ग्रुप मधून विजेता जाधव आणि उप विजेता वेदांत गव्हाणे आणि मुलींमधून श्रद्धा राठी विजेता आणि उर्वशी शमी उपविजेता ठरली. इंजिनीरिंग ग्रुप मधून तन्वी सातव आणि गौरी गावंडे यांनी बाजी मारली.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रा ज्ञानेश्वर फुंडकर, प्रा अतुल अढाव, राहुल हेलगे, कार्तिक काकडे, रोहन गुजर, अथर्व शिल्लरकर,भूषण वाघ, राम पाटील, शिवम गावंडे, पवन धुरलकर, आदित्य वराडे, श्रीकेश धुर्डे, विनय पाटील आणि इतर प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.संस्थेचे अध्यक्ष मा सागर दादा व संस्थेचे उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. ना.ऍड श्री आकाश दादा फुंडकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
Post a Comment