जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीमध्ये शासकीय आय.टी. आय नांदुरा ची विभागस्तरावर निवड
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी ३० डिसेंबर रोजी शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था बुलढाणा येथे पार पाडली. तंत्र प्रदर्शनी मध्ये १३ शासकीय व १२ अशासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थाचे ६३ तांत्रिक व अतांत्रिक उपकरण व मॉडेल ठेवण्यात आले होते. यापैकी नांदुरा येथील शासकीय आय.टी.आय अतांत्रिक गटातुन कॉस्मेटोलॉजीच्या प्रशिक्षणार्थानींनी मेकअपच्या माध्यमातुन अन्याय विरुद्ध न्यायाचा संदेश देवुन महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात न्यायाची मागणी केली आहे. सोनाली पंडीत मॅडमच्या मार्गदर्शनाने जिल्हयातुन तिसरा क्रमांक मिळवला व नेहमीप्रमाणे परंपरा याही वर्षी कायम ठेवूत विभागस्तरावर आपले मॉडेलचे स्थान निश्चीत केले आहे.
![]() |
जाहिरात फक्त शंभर रुपये |
यामध्ये, राखी अग्रवाल, निशा वैष्णव, नयना इंगळे, दुर्गा मोरे, अश्विनी गोंड, साक्षी गोंड, पल्लवी बहादरे, वैष्णवी हरमकर, स्नेहा तायडे, वैशाली हिवाळे, यांनी मॉडेल म्हणुन सहभाग नोंदविला तसेच संस्थेचे प्राचार्य श्री. गजानन काळे व जैन मॅडम मगर सर, पाटील मॅडम, उबरहंडे मॅडम, कहांळे सर, रोठे मॅडम, आकोटकर मॅडम, देवकर सर, कदम सर, मोरखडे सर, चांभारे सर यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment