भागवत कथेच्या माध्यमातून अध्यात्मिक विचार, हरिभक्त परायण पुंजाजी महाराज यांच्य वाणीतून विचार

जनोपचार न्यूज नेटवर्क

खामगाव (रत्नाताई डिक्कर) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समता कॉलनी येथे अभय पाटील सर आयोजक यांच्या वतीने भागवत सप्ताह असतो सतत दोन वर्षे झाले अभय पाटील सर भागवत कथेच्या माध्यमातून अध्यात्मिक विचार, हरिभक्त परायण पुंजाजी महाराज  यांच्या अमूल्य वाणीतून भक्तांपर्यंत पोहोचवायचे काम करतात भाविक भक्त दरवर्षी या कथेचा आनंद घेतात  महाराजांच्या अध्यात्मिक विचारातून तरुण पिढीवर जे संस्कार पडतात ते ते एक संदेश देणारे असतात की आई-वडिलांना कसे वागवायचे व कसे बाहेर काढून द्यायचे जर बाहेर काढून द्यायचे असेल तर त्यांना त्यांनी कमवली  संपत्ती देऊन बाहेर काढायचे मात्र असे तरुण पिढी करत नाही त्यांना उदास मत पाठवतात पण महाराजांनी आणखीन एक छान विचार मांडले असे की अंतरिक प्रेम काय असते आणि मायावी वस्त्र काय असते हे महाराजांनी त्यांच्या अमूल्य अशा शब्दातून तरुण पिढींना समजून सांगितले,, प्रेम करावं कोणाला कोणावर हे सुद्धा आजकालच्या तरुण पिढींना समजत नाही आणि मनातील हे विचार मॅच कोणाशी कराव हे सुद्धा त्यांना समजत नाही एखाद्या संतांचे विचार मॅच करणे हे तरुण पिढीचे सध्यातरी कार्य आहे शरीर बळकट बनवणे काळाची गरज आहे पण आजकालची तरुण व्यसनाधीन झाले व्यसनाने त्यांची शरीर संपत्ती नष्ट होत आहे य म्हणून महाराजांनी कथेच्या माध्यमातून तरुण प्रेरणा दिली व्यसनाच्या दूर राहावे हे सुद्धा समजून सांगितले येणारा काळ खूप बिकट आहे म्हणून मेहनत करा कष्ट करा व प्रामाणिक राहा कोणाचा मन कधी दुखवू नका आणि आई वडिलांना विसरू नका असं मौलिक मार्गदर्शन महाराजांनी भाविकांना दिले.

Post a Comment

أحدث أقدم