30 डिसेंबर पर्यंत केवायसी करून घ्या
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव तालुक्यातील राशन कार्ड धारकांनी 30 डिसेंबर पर्यंत आपल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन केवायसी करून घेणे अनिवार्य झाले आहे. अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय कार्ड धारकांनी कुटुंबातील सदस्यांसह जाऊन किंवा अशी करून घ्यावी. कार्डातील प्रत्येक सदस्यांनी स्वतः उपस्थित राहून आपले आधार कार्ड सोबत घेऊन जावे. 30 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने राशन कार्ड धारकांनी केवायसी करून घेणे आवश्यक असल्याचे तहसील कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. केवायसी न केल्यास धन्यापासून वंचित रहावे लागू शकते.
![]() |
Advt. |
Post a Comment