कुंभेफळ येथील ग्रंथ पठणास गौतम गवई यांची भेट
खामगाव - तालुक्यातील कुंभेफळ येथे सुरु असलेल्या " बुद्ध आणि त्याचा धम्म " ग्रंथ पठनास गौतम गवई सरचिटणीस प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र राज्य यांनी सदिच्छा भेट दिली. सर्व प्रथम वंदनीय भिखखू पट्टसेन यांनी उपस्थित अनुयायांना त्रिशरन पंचशील दिले. ग्रंथ वाचनानंतर गौतम गवई व अंबादास वानखडे माजी उपसभापती यांचे धम्मा वर विचार मांडले. ग्रंथ पठन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाल भाऊ अहिरे यांनी केले. यावेळी रघुनाथ इंगळे,देवराव इंगळे,राजेन्द्र इंगळे बाबुराव इंगळे, नारायण अहीरे स्वप्नील इंगळे, प्रविण इंगळे, अंनता इंगळे, मनोज बोदडे, विशाल सावदेकर,प्रकाश अहिरेसह महिला मंडळ उपस्थित होते. याशिवाय मंगेश भाऊ भारसाकळे यांचीही विशेष उपस्थिती होती.
Post a Comment