लॉयन्सच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे २ ऑक्टोबरला वितरण



खामगांव : लॉयन्स क्लब व धन्वंतरी चारिटेबल मेडीकल फाऊंडेशनच्या वतीने स्व. श्रा.स. बावस्कर गुरुजी स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण बुधवार दि. ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पीटल, जीएसटी ऑफीस समोर, नांदुरा रोड, खामगांव येथे आयोजित करण्यात आले आहे.


अकराव्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ग्रामीण प्राथमिक विभागातून श्री. गणेश नामदेव सातव, मुख्याध्यापक सहा. अध्यापक (जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, काजेगांव, ता. जळगांव जा.), शहरी प्राथमिक विभागातून सौ. संगिता जितेंद्रसिह चव्हाण, सहा. अध्यापक (श्री. पाई विद्यालय, जलंब, ता. शेगांव), ग्रामीण माध्यमिक विभागातून श्री. काशिराम सखाराम बोरे, (श्री संभाजी राजे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरखंडाळा, ता. बुलडाणा), शहरी माध्यमिक विभागातून श्री. शरद दिगंबर देशपांडे, सहा. अध्यापक (श्री लिलाधर भोजराज चांडक विद्यालय, मलकापूर), सेवानिवृत्त विशेष विभागातून श्री. रामेश्वर रामचंद्र कापडे, सेवानिवृत्त शिक्षक (जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळा भंडारी, ता. खामगांव), अपंग, कर्ण, मुकबधीर व आदिवासी विभागातून श्री. दिपक मुरलीधर उमाळे, सहा. अध्यापक (जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चारवन, ता. जळगांव जा.), कनिष्ठ महाविद्यालयीन विभागातून प्रा. हरिदास प्रतापसिंग सोळंके वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक (श्री.ग.भी. मुरारका कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, शेगांव) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना रु. ५००१ रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे

या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमास प्रमुख पाहुणे मा. प्रांतपाल एमजेएफ लॉ. गिरिषजी सिसोदिया, प्रमुख अतिथी मा.श्री. विरप्रतापजी (बाबुजी) थानवी, प्रकल्प प्रमुख व लॉयन्सचे माजी प्रांतपाल एमजेएफ लॉ.डॉ. अशोक बावस्कर, रिजन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. किशोर गरड, झोन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. तेजस झांबड तसेच लॉयन्स क्लबखामगांवचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.अशी माहिती आयोजकांव्दारे लॉयन्स क्लबचे प्रसिध्दी प्रमुख लॉ. डॉ. परमेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.



Post a Comment

أحدث أقدم