गजानन कॉलनीतील सेवानिवृत्त अभियंता ठाकूर यांचे घर फोडले:70 हजारांचा मुद्देमाल लंपास

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- घर बंद करून बाहेरगावी गेलेल्या सेवानिवृत्त अभियंताचे अज्ञात चोरट्याने घर फोडून ७० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गजानन कॉलनी येथे २५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १.३० वाजेदरम्यान उघडकिस आली. गजानन कॉलनी भागातील रहिवासी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता अशोक रामराव ठाकूर (68) हे पत्नीसह घर बंद करून बाहेरगावी गेले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. अंगात असलेल्या एमसीबी बंद केल्यानंतर सुरांनी चोरी केले. सीसीटीव्ही कॅमेरे ह बंद करून डीव्हीआरही चोरट्यांनी लंपास  केला. याबाबत अशोक ठाकूर यांनी शहर  पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

Post a Comment

أحدث أقدم