घृणास्पद: मित्राच्या १४ वर्षीय मुलीवर पोलीस पाटलाकडून अत्याचार
✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
65 वर्षाच्या मित्राने मित्राच्या 14 वर्षे मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या ६२ वर्षीय पोलीस पाटलानेच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिचे शारीरिक शोषण केल्याची घटना पेण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील डोलवी येथील रमेश अंबाजी पाटील याने आपल्या जिवलग मित्राच्या १४ वर्षीय मुलीवर सतत २ वर्षे अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने खळबळ माजली आहे. रमेश अंबाजी पाटील याने आपल्या मैत्रीचा व ओळखीचा गैरफायदा घेवून अल्पवयीन मुलीला स्पर्श करून अश्लील चाळे केले. तसेच मुलीच्या वडिलांना मारण्याची धमकी देवून २०२२ पासून ऑक्टोबर २०२४ पर्यंत तिला बोरी, कार्ला व लोणावळा या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैगिक अत्याचार केले.
सदर प्रकरण अल्पवयीन मुलीच्या आईला समजताच तिने वडखळ पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या संदर्भात वडखळ पोलिस ठाण्यात सीआर नं. १४९/२०२४ बी. एन. एस. कलम ६४ (२) (आय) (एम), ६५ (१),७४, (७५ (१) (१) (४), ७९, ३५१ (२) । बालकांचे लैगिंक अत्याचारापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४,६,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
إرسال تعليق