लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे शालेय विद्यार्थ्यांची देशभक्तीपर नृत्य स्पर्धा 'लहराओ तिरंगा प्यारा'
खामगाव-जनोपचार न्यूज नेटवर्क - लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे आपल्या संस्कृतीला व देशभक्तीला उजाळा देण्यासाठी मंगळवार दि.६ ऑगष्ट २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपासून स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर स्मारक मंदीर सभागृह, खामगांव येथे स्वातंत्र दिनाच्या अनुषंगाने बालगटातील, प्राथमिक गटातील व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर भव्य नृत्य समुहाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत (अ) बालगट नर्सरी ते युकेजीच्या विजयी स्पर्धकांना प्रथम पुरस्कार ३१०० रू. द्वितीय पुरस्कार २१०० रू तर तृतीय पुरस्कार ११०० रू. यामध्ये देशभक्तीपर नृत्य राहील. (ब) प्राथमिक गट वर्ग १ ते ४ विद्यार्थ्यांकरीता प्रथम पुरस्कार ३१०० रू. द्वितीय पुरस्कार ३१०० रू तर तृतीय पुरस्कार ११०० रू. यामध्ये राज्यस्तरीय उत्सवाबाबत नृत्य राहील. (क) माध्यमिक गट वर्ग ५ ते ८ विद्यार्थ्यांकरीता प्रथम पुरस्कार ३१०० रू. द्वितीय पुरस्कार ३१०० रू तर तृतीय पुरस्कार ११०० रू. यामध्ये महान स्वातंत्र सेनानी (ड्रामा व डान्स) राहील. (ड) माध्यमिक गट वर्ग ९ ते १० विद्यार्थ्यांकरीता प्रथम पुरस्कार ३१०० रू. द्वितीय पुरस्कार ११०० रू तर तृतीय पुरस्कार ११०० रू. फोल्क डान्स कोणत्याही एका राज्याचे राहील. (इ) दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता खुला गट प्रोत्साहनपर एक पुरस्कार देण्यात येईल. यावेळी जिल्हा प्रांतपाल पीएमजेएफ लॉ. गिरीष सिसोदीया, आमदार मा. धिरज लांगाडे, दैनिक देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे, रिजन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. सुरज एम. अग्रवाल, झोन चेअरपर्सन एमजेएफ लॉ. उज्वल गोयनका यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन लॉयन्स क्लब संस्कृतीतर्फे अध्यक्ष लॉ. शैलेश शर्मा, सचिव लॉ. तेजेंद्रसिंह चौहान, कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार, प्रोजेक्ट चेअरपर्सन लॉ. गोविंद चुडीवाले, लॉ. संजय उमरकर, एमजेएफ लॉ. सुरज बी. अग्रवाल, लॉ. रविंद्रसिंग बग्गा, लॉ. योगेश शर्मा, लॉ. पियुष टिबडेवाल यांनी केले आहे. उपरोक्त माहिती डिस्ट्रीक्ट कॅबीनेट ऑफीस एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका पीआरओ यांनी दिली आहे.
Post a Comment