यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार

पाचव्या सोमवारी निघणार ऐतिहासीक श्री नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने खामगांवात भव्य शोभायात्रा - संस्थापक अध्यक्ष राहुल कळमकार

खामगांव : जनोपचार न्यूज नेटवर्क - बुलडाणा जिल्ह्यातील ऐतिहासीक अशा खामगांव शहरातील मानाची कावडयात्रा वतीने दरवर्षी मराठी श्रावण मासानिमीत्त प्रत्येक श्रावण सोमवारी तिर्थक्षेत्रांवरून कावडी व्दारे पवित्र जल आणून त्या जलाने भगवान शंकर यांच्या पिंडीला जलाभिषेक केला जातो. यावर्षी पहिला मराठी श्रावण सोमवार दि. ०५ ऑगस्ट रोजी येत असून या दिवशी तिर्थक्षेत्र नागझरी येथून तर दुसरा श्रावण सोमवार दि. १२ ऑगस्ट रोजी तिर्थक्षेत्र मोहाडी, तिसरा श्रावण सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी तिर्थक्षेत्र येरळी (पुर्णा), चवथा श्रावण सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी तिर्थक्षेत्र किन्ही महादेव आणि शेवटचा पाचवा सोमवार दि. २ सप्टेंबर रोजी तिर्थक्षेत्र चांगदेव मुक्ताई येथून पवित्र जल आणून खामगांव शहरातील मुख्य पाच महादेव मंदिरात जलाभिषेक करण्यात येणार आहे. दि. २ सप्टेंबर रोजी पाचव्या श्रावण सोमवारी अमावश्या येत असल्यानंतरही हा दिवस मराठी श्रावण महिन्याचा अखेरचा दिवस आणि सोमवार येत असल्यामुळे या दिवशी जलाभिषेक करण्यात येणार आहे. तरी सर्व कावडधारी मंडळ व शिवभक्त यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री नवयुवक मानाची कावड यात्रा चे संस्थापक अध्यक्ष राहुल कळमकार यांनी केले आहे.तसेच दि. ०२ सप्टेंबर रोजी श्री नवयुवक मानाची कावड यात्रा वतीने खामगांव शहरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत सर्व शिवभक्त आणि कावड यात्रा मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील श्री नवयुवक मानाची कावड यात्राचे संस्थापक अध्यक्ष राहुल कळमकार यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post