जिल्हा संपर्क प्रमुख प्रा नरेन्द्र खेडेकर विजयी व्हावे यासाठी महिला शिवसेना आघाडीचे वतीने शिवपूजा व जलाभिषेक
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र खेडेकर यांच्या विजयासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महापूजा व जलाभिषेक करण्यात आला. स्थानिक फरशी येथील शिवजी व तुळजाभवानी माता मंदिरात महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. श्रुतीताई पतंगे व दिनेश पतंगे शहर संघटक यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. शहर प्रमुख ज्योतिताई तारापुरे सौ बबिता हटेल नंदाताई दुबे पुजा प्रसंगी हजर होते .निष्ठावान शिवसैनिक अभिषेक जोशी महाराज यांचे विधिवत मंत्रोपचाराणे शिवपूजा व भवानी मातेला साकडे घालून महापूजा व जलाभिषेक आयोजित करण्यात आला होता.
सदर महापूजा व जलाभिषेक कार्यक्रम करिता उद्योगसहकार सेना जिल्हा प्रमुख शिवसेना डॉ संतोष तायड़े आरोग्य सेना प्रमुख श्रीराम खेलदार विधानसभा संघटक रविभाऊ महाले जेष्ठ शिवसैनिक सुभाषसिंह ठाकुर उपशहर प्रमुख दिनेश पतंगे डॉ ज्ञानेश्वर रावणकर, डॉ अतुल बढे, श्री किशोर भुतकर, श्री अक्षय जोशी, श्री आश्विन जाधव, रवी महाले तथा शिवसेना महिला आघाडीच्या सर्व महिला व निष्ठावान शिवसैनिक यांची उपस्तिथि होती .
إرسال تعليق