व्हॉईस ऑफ मीडिया आरोग्य सेलच्या  जिल्हा समन्वयक पदी सुरज यादव 



खामगांव :-  व्हॉईस ऑफ मिडिया हेल्थ विंग ची नुकतीच कार्यकारिणी वाय .बी. चव्हाण सेंटर मुंबई येथे दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पार पडली. त्यामध्ये रुग्णसेवक सुरज शिवमुरत यादव यांची आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी असून रुग्णासाठी त्यांची धावपड सुरूच असते रक्ताच्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांना जिवन संजीवनी दिलेली आहे रुग्णांच्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहून हॉस्पिटल मध्ये भरती करून डॉक्टरांकडून योग्य तो उपचार करून घेऊन त्यांना सर्व सोय सुविधा उपलब्ध देत रुग्णांना घरा पर्यंत पोहचविणे निशु:ल्क सेवा आर्थिक मदत तसेच रुग्ण ऍडमिट पासून तर डिस्चार्ज होईल पर्यंत त्यांची संपूर्ण जबाबदारी योग्य पणे पार पाडतात या सगळ्या कामाची दखल व्हाईस ऑफ मिडीया राष्ट्रीय सेल अध्यक्ष मा. श्री. भिमेश मुतूला यांनी घेत बुलढाणा जिल्ह्याच्या वरिष्ठ समन्वयक आरोग्य सेल पदी त्यांची निवड करण्यात आली तर सहकारी म्हणुन बुलढाणा जिल्हा ग्रामीण समन्वयक पदी जितेंद्र बादलगिर मच्छरे तर बुलढाणा जिल्हा शहर समन्वयक पदी सागर शामराव बेटवाल यांची निवड करण्यात आली. असून आरोग्य करीता जिल्ह्यातील पत्रकारांच्या आरोग्यासाठी त्यांना न्याय योग्य उपचार मिळावा त्यांचा हक्क मिळवण्यासाठी आपली पारदर्शकता राहील त्यांच्यासाठी काम करतील अशी अपेक्षा चे ते बोलले कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मंत्री मा. श्री मंगल प्रभात लोढा,  कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिष लढ्ढा, प्रमुख पाहुणे शिवसेना युवा मा. श्री. विजय वडेट्टीवार, युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहितदादा पवार, आमदार राहुल पाटील, प्रवीण गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, सम्राट फडणवीस सकाळ आयुष्यमान योजनेचे प्रमुख ओम प्रकाश शेटे सर मंत्रालयामधील डॉ नामदेव भोसले, माजी पालक मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय अध्यक्ष, आरोग्य सेल चे भिमेश मुतुला, सोबत प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अजित कुंकुलोळ, कार्याध्यक्ष तुषार रसाळ या कार्यक्रमाला आदि लोकांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post