महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई व्दारा प्रायोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन खामगांवच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला प्रथम पुरस्कार

प्रश्नमंजुषा लोकांना एखाद्या विषयाची विस्तृत किंवा विशेष समज मिळविण्यात मदत करू शकते. या स्पर्धांमुळे शिक्षण पद्धतींना प्रोत्साहन मिळते आणि सामान्य ज्ञान वाढते. प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांना चौकटीबाहेर किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यास मदत करू शकतात. शैक्षणिक गुणवत्तेचे बदलते निकष, अद्ययावत तांत्रिक ज्ञान व विद्यार्थ्यांचासर्वांगीण विकास या बाबींना महत्व प्राप्त झालेले असून विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वृद्धिंगत करण्याकरिता शैक्षणिक बाबीबरोबरच सहअभ्यासक्रम उपक्रमांना प्राथमिकता देणे ही काळाची गरज बनली असून त्याकरीता विविधतांत्रिक उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या  सर्जनशीलतेला प्रेरणा देणे, त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती जागृत करणे यांची सांगड घालणे यास महत्व प्राप्त झालेले आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याव्दारे प्रायोजित संगणकअभियांत्रिकी या ग्रुप करिता राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन डॉ एस एम गोसावी तंत्रनिकेतन नाशिक येथे मंगळवार दि. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. स्पर्धेकरिता संपूर्ण राज्यातून विविध शासकीय व खाजगी तंत्रनिकेतन संस्थामधुन एकूण २५ संस्थांनी भाग घेतला होता. सदर  स्पर्धेत संस्थेतील अंतिम वर्ष संगणक अभियांत्रिकीचे श्री धनेश शिंगाडे आणि श्री गौरव सोनार या विद्यार्थ्यानी  प्रथम क्रमांक पटकाविला आणि स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये १५,०००/- व प्रमाणपत्र प्राप्त केले.  मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच संगणक विभागप्रमुख प्रा संदीपपरांजपे, मार्गदर्शक प्रा विजय बांडे आणि संस्थेतील सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.विद्यार्थीभिमुख स्पर्धांचे आयोजन करून त्यांचे भवितव्य घडविण्यासाठीप्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईचे संचालक डॉ प्रमोद नाईक, सचिव डॉ महेंद्र चितलांगे व विभागीयकार्यालयाच्या उपसचिव श्रीमती कांचन मानकर यांचेप्रती आपले आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post