शिव आरोग्य सेनेचा तालुका समन्वयक पदी सुभाष सिंह ठाकुर यांची नियुक्ती
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजसेवेच्या प्रेरणेतून कार्यरत असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने "शिव आरोग्य सेना" या विभागाची सुरवात करण्यात आली आहे. शिवसेना या पक्षाच्या मूळ विचारधारेप्रमाणे राष्ट्रसेवा करीत असताना सर्व सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी या हेतूने हे कार्य अविरत चालू आहे. या कार्यात बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका - तालुका समन्वयक या पदावर श्री सुभाष सिंह ठाकुर यांची निवड करण्यात आली आहे. ठाकूर यांच्या नियुक्ती बद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
Post a Comment