दिवाळीच्या दिवशी मेघाचा दुर्दैवी मृत्यू

पती व सासरच्या मंडळींनी दिले होते पायाला चटके: अखेर मेघाने मृत्यूला कवठाळले!


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-हुंड्यातील उर्वरित रक्कम मिळावी यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहित मेघाला इतके छळले की तिने थेट मृत्यूलाच कवठळले .ही दुर्दैवी घटना मलकापूर तालुक्यातील खामखेड येथे दिवाळीच्या दिवशी उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार खामगाव तालुक्यातील हिवरा खुर्द येथील श्रीकृष्ण बघे यांच्या मेघा नाम मुलीचा विवाह खामखेड येथील गणेश मुंडे यांच्यासोबत झाला. लग्नात मुलीच्या अंगावरील दागिने व अंगठी ठरल्याप्रमाणे देण्यात आली मात्र ,हुंड्यातील एक लाख रुपये उर्वरीत रक्कम वधू पित्याने देण्याचे कबूल केले. नापिकी व परिस्थिती मुळे मेघाच्या पित्याने वेळ मागितला. मात्र सासर कडील  मंडळींनी ऐकून घेतले नाही मुलीचा इतका छळ केला की तिने अखेर मृत्यूलाच कवठळले. याबाबत मृतक मेघा चे वडील श्रीकृष्ण बघे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पती 1. गणेश शलीग्राम मुंडे, 2. सासरे शालीग्राम शंकर मुंडे, 3. सासु कमलबाई शालीग्राम मुंडे, 4. जेठानी सौ. सुनंदा प्रकाश मुंडे, 5. जेठ अनिल शंकर मुंडे, 6. चुलत जेठ सापुर्खा मनोहर मुंडे, 7. जेठानी सौ. रेखा सपूर्दा, 8.नंनद ललीता शालीग्राम मुंडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. आता न्यायालयाने आम्हाला न्याय द्यावा अशी अपेक्षा श्रीकृष्ण बघे यांनी व्यक्त केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post