रोटरी क्लब खामगांवद्वारे चांद्रयान-३ या विषयावर स्पीकर मिटींग संपन्न
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- रोटरी क्लब खामगांव आपल्या सदस्यांचे व्यक्तिमत्व विकास व्हावे किंवा त्यांना जगात सुरु असलेल्या विविध घडामोडींची माहिती व्हावी या उद्देशाने साधारणतः प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे वर्षातून १२ ते १५ स्पीकर मिटींगचे आयोजन करीत असते. यामध्ये स्थानिक पातळीवरील विषयांपासून ते जागतिक स्तरावरील विषयांपर्यंतचे विविध मुद्दे समाविष्ट केल्या जातात. अशी जाहिरात फक्त 99 रुपये संपर्क 8208819438,9422883802
या अंतर्गत रविवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रोजी औद्योगिक परिसरातील विकमशी फॅब्रिक्स येथे सकाळी १० वाजता "चांद्रयान-३ मोहिमेत विकमशी फॅब्रिक्सचे सहभाग" या विषयावर कंपनीचे प्रमुख संचालक श्री स्वर विकमशी यांचे अतिशय माहितीपूर्ण मार्गदर्शन उपस्थितांना मिळाले. जसे की आपण सर्व खामगांववासी हे जाणतो की चांद्रयान-३ या मोहिमेत खामगांव शहारातील विकमशी फॅब्रिक्सचे अत्यंत मोलाचे सहभाग आहे, त्यामुळेच आपल्या शहराचे नांव चांद्रयान उडाल्यानंतर कितीतरी दिवस टीव्हीवर झळकत होते. साधारणपणे ४० वर्षांआधी त्यांच्या आजोबांनी लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतरण कसे झाले याचे अत्यंत मार्मिक विवेचन त्यांनी केले. शेतीमाल झाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ताडपत्र्यापासून ते चांद्रयानात वापरण्यात आलेल्या थर्मल शिल्ड पर्यंतचा प्रवास त्यांनी पॉवरपॉईंट प्रेजेंटेशनद्वारे अतिशय रोचकपणे उलगडून दाखविला. त्यांच्या या प्रवासाची व्याप्ती बघून उपस्थितजन अक्षरशः थक्क झाले. त्यातल्या त्यात श्री स्वर विकमशी यांची विषयावरची पकड आणि वाणीतील रसाळता यामुळे सुमारे एक तास चाललेले हे सत्र श्रोत्यांसाठी माहितीपूर्णसोबत मनोरंजकही ठरले. खामगांवसारख्या छोट्याश्या गावातुन तंत्रज्ञानाची ही झेप डोळे दिपवून टाकणारी ठरावी. त्यानंतर त्यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली आणि त्यांची जिज्ञासा शमविली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत झाल्यानंतर श्री स्वर विकमशी यांचा परिचय रो नितीन शाह यांनी करून दिला. तसेच प्रमुख संचालक श्री स्वर विकमशी, प्रबंधकीय संचालक श्रीमती गितिका विकमशी आणि विकमशी फॅब्रिक्सचे जनरल मॅनेजर श्री चौधरी यांचा पुस्तकरूपी उपहार देऊन त्यांचा सत्कार अनुक्रमे रो प्रमोद अग्रवाल, रो सोहन झाम्बड व रो सुनिल नवघरे यांनी केला. या छोटेखानी समारंभाचे संचालन व आभारप्रदर्शन रो प्रा राजेश मंत्री यांनी केले. असे मनोरंजक, रोचक व माहितीपूर्ण स्पीकर मीटिंगचे आयोजन केल्याबद्दल सर्व सदस्यांनी अध्यक्ष रो सुरेश पारीक व मानद सचिव रो आनंद शर्मा यांचे अभिनंदन केले आहे. विकमशी परिवारातर्फे यावेळेस सर्व उपस्थितांकरिता अल्पोपाहाराचे व चहा कॉफीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास रोटरी परिवारातील शंभरहुन अधिक सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला.
إرسال تعليق