प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा खामगाव च्या वतीने पूरग्रस्त परिवाराकरिता धान्य तसेच किराणा साहित्य प्रदान
जळगाव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द तसेच वडशिंगी या दोन ग्रामीण भागामध्ये पूरग्रस्त भाऊ बहिणींना पाठवलेला सहयोग 136 किट या दोन गावांमध्ये सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शकुंतला दीदी तसेच ब्रह्माकुमारी सुषमा दीदी यांचा हस्ते वाटण्यात आल्या.
यावेळी केंद्र संचालिका शकुंतला दीदी यांनी गावकऱ्यांना मानसिक आधार देण्याकरिता ईश्वरीय ज्ञान तसेच राज योगा चे महत्त्व सांगितले व त्या म्हणाल्या ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये वसुदेव कुटुंबकम ही ईश्वरीय शिकवणूक दिल्या जाते म्हणून आपण सर्व एका ईश्वराची संतान एक परिवार आहोत त्यामुळे आपण आपल्या परिवारातील सदस्यांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे म्हणून ब्रह्माकुमारीस परिवारातील सदस्यांनी हा ईश्वरीय सहयोग आपल्याला दिला आहे आपण ईश्वरीय प्रसाद म्हणून स्वीकार करावा.
आपण स्वतःवर विश्वास ठेवून आपलं आत्मबळ जागृत करा ईश्वरावर विश्वास ठेवा या परिस्थितीतूनही काहीतरी मार्ग निघेल अशी शुभ भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हा कार्यक्रम शांततेने पार पाडण्यासाठी यावेळी सरपंच सौ ताई वसंता बोदडे अकोला खुर्द, वरिष्ठ नागरिक उत्तमराव राखुंडे यांचे सहकार्य लाभले, तसेच वडशिंगी येथील सरपंच सौ शीतल सुनील वानखडे, रामेश्वर मानकर, संजय वानखडे यांचे सहकार्य लाभले तसेच गावकऱ्यांनीही शांतता ठेवण्यास सहकार्य केले. ब्रह्माकुमारीस परिवारातील श्रीकृष्ण खंडारे, मंदाकिनी खंडारे, लोकेश अग्रवाल अंकिता अग्रवाल, चंद्रशेखर मानकर, मनीषा मानकर, पंकज बुलानी, पूनम बुलानी, गजानन मनसुटे, बाबुराव देशमुख, अभय महाजन, सागर वाघ, रामदास चौधरी, ज्ञानेश्वर तायडे, उमेश इंगळे, रामेश्वर जोहरी, प्रभाकर मांजरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Post a Comment