जनोपचार द रियल न्यूज

 रोटरी क्लब खामगांवद्वारे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन


 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- रोटरी क्लब खामगाव च्या वतीने तसेच सिल्वर सिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल यांच्या सहयोगाने येत्या रविवारी म्हणजेच ०४ जून २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या दरम्यान एका भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर आयोजन हे जलम्ब रोड स्थित सिल्वरसिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरात एकाच छताखाली रूग्णांना विविध क्षेत्रातील निष्णात डॉक्टर्सच्या वैद्यकीय सेवा व उचित असे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहेत.



या शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, न्यूरॉलॉजी, किडनी, युरॉलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जरी, सांधेरोपण, लिव्हर व पोटविकार, सौंदर्य व चर्मरोग, ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपिस्ट विषयाशी संबंधित नागपूर, अकोला व खामगांव येथील सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स जसे की डॉ अमितकुमार जैस्वाल, डॉ सौरभ संचेती, डॉ अभय बागुल, डॉ अखिलेश अग्रवाल, डॉ प्रशांत मालवीया, डॉ जयदीप महाजनी, डॉ हेमंत मानकर, डॉ समीर देशमुख, डॉ आशिष तापडिया, डॉ प्रतीक मोहता व डॉ ईशा मोहता सोबतच सिल्वरसिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल खामगांव येथील निष्णात डॉक्टर्स जसे की डॉ प्रशांत कावडकर, डॉ अशोक बावस्कर, डॉ पंकज मंत्री, डॉ भगतसिंग राजपूत, डॉ निलेश टिबडेवाल, डॉ प्रवीण पाटील, डॉ गणेश महाले, डॉ पराग महाजन, डॉ गुरुप्रसाद थेटे, डॉ गौरव गोएनका, डॉ आनंद राठी, डॉ गौरव लढ्ढा, डॉ गिरीश पवार, डॉ अनुप शंकरवार, डॉ पल्लवी गांधी यांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत हे विशेष.


तरी या शिबिरात जास्तीत जास्त रूग्णांनी सहभागी व्हावे, तसेच आपल्या मित्रांना व परिवारजनांना याची माहिती द्यावी आणि अशा अभिनव भव्य रोगनिदान शिबिराचा फायदा करून घ्यावा असे आवाहन  प्रकल्पप्रमुख रो नकुल अग्रवाल, सह-प्रकल्पप्रमुख रो कौस्तुभ मोहता, रोटरी क्लब अध्यक्ष रो आलोक सकळकळे आणि रोटरी क्लब सचिव रो रितेश केडिया यांनी केलेले आहे. नांव नोंदणी करणे आवश्यक असून त्यासाठी सिल्वरसिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक ९१४६१८५६१२ जाहीर करण्यात आलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post