डॉ.पी.आर. उपर्वट यांच्या पुस्तकाचे थाटात प्रकाशन.
खामगांव : येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा बुलडाणा जिल्हा योगा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.पी.आर. उपर्वट यांच्या ' तथागतांचे २३ उपदेश' या पुस्तकाचे थाटात प्रकाशन दिनांक २८ फेब्रुवारी रोजी जी. वि. मेहता नवयुग विद्यालय येथे करण्यात आले.
जी. वि. मेहता नवयुग विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका कल्पना उपर्वट यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकररावजी बुराडे होते तर प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव महादेवराव भोजने, बाळासाहेब काळे, माधवराव कांबळे, प्राचार्य सुनील जोशी, सत्कार मूर्ती सौ. कल्पना उपर्वट, प्रल्हाद निमकंडे, गजानन खरात सर होते. सर्वप्रथम अतिथीच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य सुनील जोशी यांनी केले. त्यानंतर तथागत भगवान बुद्ध यांनी ८४००० उपदेश आपल्या जीवन काळात केले. त्यावर आधारित ' तथागतांचे २३ उपदेश' ह्या डॉ. पी.आर. उपर्वट लिखित पुस्तकाचे प्रकाशन अतिथीच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन केले. महादेवराव भोजने यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यामुळे साहित्य निर्मिती होत असते, असे सांगितले. यावेळी डॉ. उपर्वट यांनी पालि भाषेतील गाथांचा उच्चार करून बुद्धांचे विचार हे जगाच्या कल्याणासाठी आवश्यक आहेत, असे सांगितले. अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या पुस्तकास ज्येष्ठ साहित्यिक मायाताई दामोदर यांनी प्रस्तावना लिहिली असून अजिंक्य प्रकाशन , वाशिम यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. कार्यक्रमाचे संचालन सौ. वर्षा पारखेडे यांनी तर आभार प्रदर्शन संजय बोरे यांनी केले.
إرسال تعليق