विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा खामगाव ची कार्य तत्परता : वारसाला विमा रक्कमेचे वाटप
जनोपचार न्यूज नेटवर्क
खामगावः विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या खामगाव शाखेचे खातेदार बाळकृष्ण वासुदेव मानकर रा.ढोरपगाव यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या वारसाला दोन लाख रुपये विमा निधी सुपुर्द करण्यात आला. मानकर यांच्या बचत खात्याला प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचे संमती पत्र घेण्यात आले होते. दुदैवाने 25 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचे अचानक निधन झाले. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन बँकेची क्लेम कंपनीकडे पाठवला आणि अवघ्या 45 दिवसात रु.दोन लाख विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. त्याप्रसंगी खामगाव शाखेचे अधिकारी पुष्पा पाटील, प्रशांत तेलगोटे, सुशिल वऱ्हाडे, वर्षा सरकटे, मेहेंद्र देशमुख, गणेश देशमुख, श्रृती साठे, शरीका पठाण उपस्थित होते.
Post a Comment