लॉयन्स एक्स्पो २०२३ च्या कार्यालयाचे उद्घाटन व माहितीपत्रकाचे विमोचन
खामगाव (नितेश मानकर) स्थानिक सामाजिक सेवाभावी संस्था लॉयन्स क्लब खामगांव व्दारा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
लॉयन्स एक्स्पो २०२३ - भव्य व्यापार, कृषि, व्यंजन व मनोरंजन प्रदर्शनी चे आयोजन दि. २५
जानेवारी ते ३० जानेवारी २०२३ दरम्यान शासकीय तंत्रनिकेतन मैदान, जलंब रोड, खामगांव येथेआयोजित केले आहे.
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹ADVT.₹₹₹₹₹₹_₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
लॉयन्स एक्स्पो मध्ये व्यापाऱ्यांसाठी कमर्शियल झोन, खवय्यांसाठी चविष्ट फुड
झोन व बालगोपालांच्या मनोरंजनासाठी अॅम्युझमेंट झोन तसेच युवा व युवतींसाठी आपल्या
कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मा. प्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरीया यांनी नुकतीच लॉयन्स क्लब खामगांवला सदिच्छा
भेट दिली त्याप्रसंगी लॉयन्स एक्स्पो २०२३ चे माहितीपत्रक (एक्स्पो ब्रोशर) चे विधिवत विमोचन
मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच लॉयन्स एक्स्पो २०२३ च्या कार्यालयाचे उद्घाटन
लॉयन्सचे प्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरीया यांचे हस्ते व माजी प्रांतपाल लॉ डॉ. अशोक बावस्कर,
झोन चेअरमन लॉ. धर्मेश शहा, लॉयन्स ट्रस्ट चे अध्यक्ष लॉ. आर. जी. भुतडा व लॉयन्सच्या इतर
पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फित कापून करण्यात आले.
नांदुरा रोड स्थित, जिएसटी ऑफीस समोरील नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पिटल मध्ये
सदर लॉयन्स एक्स्पो चे कार्यालय सकाळी ११ ते १ व सायं. ८ ते १० या वेळेत कार्यरत असणार
आहे. लॉयन्स एक्स्पो २०२३ मध्ये ज्या व्यवसायींकांना आपल्या उत्पादनाची जाहीरात, प्रदर्शन व
विक्री करावयाचे आहे त्यांनी ऑफीसमध्ये संपर्क साधावा असे आवाहन लॉयन्स एक्स्पो २०२३ चे
चेअरपर्सन लॉ. तुषार कमाणी (मो. ९८२२४६३३४६), संयोजक लॉ. राजेंद्र नहार ( मो.
९४२२१८०२६८), सचिव लॉ. शंकर परदेशी (मो. ९४२३७२१२५७), कोषाध्यक्ष लॉ. श्रमिक
जैस्वाल (मो. ९४२३४४५२०२), क्लब अध्यक्ष लॉ. महेश चांडक (मो. ९४२३१४४२१४), क्लब
सचिव लॉ. पिनेश कमाणी (मो. ९९२२८७०७८४) यांनी केले आहे. असे या प्रसिध्दीपत्रकाव्दारे
कळविण्यात येत आहे.
Post a Comment