गोपालकांनी लंम्पीसाठी वैद्य श्री पदमाकर भोज यांनी सांगितलेला उपाय एकदा अवश्य़ करुन बघा – जितेंद्र कुयरे
आपण सर्व गोवंशावर आलेल्या लंपी या आजारामुळे त्रस्त़ आहात. अनेकांनी आपल्या जिवापार जपलेले गोवंश या महाभयंकर महामारीमुळे गमावले देखील आहेत. मी माझा स्वत़:चा अनुभव आपणास सांगू इच्छीता.
माझ्याकडे “लक्ष्मी” गिर जातीची गाय आहे. या गायीला लम्पी हा आजार झाला होता. या गायीला मी सुरवातीला मीरे 10 ग्राम, लवंग 10 ग्राम, मीठ 10 ग्राम, हळद 20 ग्राम, गुळ 250 ग्राम, व विडयाचे पान 10 यांचे मिश्रण करुन खाऊ घातले तर ती लगेच या आजारातून मुक्त़ झाली. पण तिच्या बरे होण्यामागे तिचे लसीकरण झालेले असल्यामुळे ती ताबडतोब बरी झाली.
परंतु याच गाईचा गोरा “भोला” याला देखील लम्पी हा आजार झाला. त्यावर पशु वैद्यकीय अधिकारी श्री अवताळे यांचे त्यांची सहकारी यांनी नियमीत औषधोपचार केले. त्यासोबत उपरोक्त़ औषधोपचार व आयुर्वेदिक मकरध्वज़ 2 ग्राम व शिला शिंदुर 2ग्राम हे एकत्र करुन तीन दिवस सकाळ संध्याकाळ श्वासारी प्रवाही 50 मि.ली. सोबत एकत्र करुन 3 दिवस सकाळ संध्याकाळ पाजले. त्यामुळे त्यांचे फुफुस हे सुरक्षीत झाले.
परंतु त्यांची प्रकृती खुपच चिंताजनक झाली होती तो मागील 12 दिवसांपासून खाली बसला नव्हता त्याला खाली मान करुन खाता येत नव्हत़ म्ह़णून त्याला सहज खाता येईल् एवढया उंचीवर कुटार ढेप त्याला मांडली व त्याने खाने सुरु ठेवले. त्याची तब्येत खराबच होती.
त्यानंतर वैद्य श्री पदमाकर भोज नाथ प्लॉट खामगांव यांच्या सल्ल्यानुसार त्याला अर्धा लिटर शेंगदाणा तेल, 1 लिटर गुळाचे पाणी व 5 चमचे आंबेहळद पावडर हे एकत्र करुन एकदाच पाजले.
त्यांच्या सांगण्यानुसार 72 तासात फोड फुटतात किंवा फोड सुकतात त्याप्रमाणे केवळ 24 तासातच फरक दिसायला सुरुवात झाली व आज केवळ 48 तासातच भोला चांगल्याप्रकारे चालायला लागला व पोटभर खात आहे.
माझी सर्व शेतकरी व गोपालक बांधवांना विनंती आहे की आपण वैद्य श्री पदमाकर भोज यांनी सांगितलेल्या सल्लयानुसार लम्पी या आजारासाठी खालील उपाय करावा नक्कीच आपले गोवंश सुरक्षीत होतील.
अर्धा लिटर शेंगदाणा तेल,
1 लिटर गुळाचे पाणी
व 5 चमचे आंबेहळद पावडर हे एकत्र करुन एकदाच पाजावे.
यानंतर फोड फुटल्यावर बैलाच्या अंगावर पोत्याची झुल टाकावी व फोड फुटलेल्या जखमांवर आंबेहळद लावावी.
जितेंद्र अशोकराव कुयरे, खामगांव 9422200008
إرسال تعليق