२५ वर्षीय तरुणीवर खामगावात अत्याचार
खामगाव : तु हॉटेल में काम करेवाली औरतो के साथ मत बोल असे म्हणत २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या 27 वर्षीय युवकाविरुद्ध शहर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार तरुणी ही रस्त्याने जात असतांना आरोपी समीर मोहम्मद नजीर (२७) रा.जुनाफैल याने तिला भडभडी जिनाच्या मोकळ्या जागेत अंधारात नेत होता. दरम्यान तिने आरडाओरड केली असता, समीरने तिचे तोंड दाबून चिल्ला मत नही तो तुझे खल्लास करुंगा, अशी धमकी देत जबरदस्तीने अत्याचार केल्याची तक्रार तीने शहर पोस्टेला दिली. यावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६ भादवीनुसार गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार प्रदीप त्रिभुवन हे स्वःता करीत आहेत.
Post a Comment